Sunday 5 July 2015

भाग आठवा आणि शेवटचा : एक गोष्ट त्यांची पण

भाग आठवा आणि शेवटचा :  एक गोष्ट त्यांची पण 

आकाश , आणि  त्याचे मन त्याच्या नावा   इतकाच मोठे होते . म्हणूनच त्याला सगळ्या गोष्टींचा त्रास जास्त होत होता . आपल्या घरी  राहायला आल्या पासून , त्याला एकी कडे बरे पण वाटत होते आणि दुसरी कडे भूतकाळ सतत डोळ्या समोरून जात होता . किती छोटे छोटे प्रसंग , आणि त्याचे किती वेगवेगळे अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने . त्याला उगचाच तो दिवस आठवला . इरा आणि आजी , कंटाळा आला म्हणून आठवडा भर ,  आजीच्या बहिणीकडे , म्हणेज आमच्या मावशी आज्जी कडे  कडे गेल्या होत्या . तिला हि त्यांची सोबत हवीच होती . आकाश साधारण १४-१५ वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट . आई बाबा आणि तो असे तिघेच घरात होते . आई बाबा काही तरी बोलत होते , आकाश त्याच्या रूम मध्ये अभ्यास करत बसला होता ,, एकदम त्याला 
इराचे नाव ऐकू आले आणि बाबा चा आवाज थोडा मोठा झाला , ते आई शी इतक्या मोठ्या आवाजात का बोलत आहेत असे त्याला वाटले , आई बाबांचे बोलणे असे ऐकू नये हे माहित असताना पण तो ऐकत होता 
"हे शक्य नाहीये , म्हणजे अधून मधून सुट्टीला जाने इथ पर्यंत ठीक आहे . आणि ती आपल्या मुलांना कधी पण भेटू शकते , पण इरा साठी म्हणत असशील तर शक्यच नाही . तू स्वताच जें ठरवले होतास ते कसे विसरू शकतेस आणि आई , आणि आकाश ला तर अजिबात आवडणार पण नाही "- बाबा 
"पण अरे मी कायमचे थोडी न म्हणतीये , १-२ वर्षाचा तर प्रश्न आहे . विनिताला पण गरज आहे बदलाची . आणि जवळच तर जायचे आहे "- आई 
"नाही , नको . हा निर्णय माझ्या वर लादू  नकोस प्लीज . विनीता काही गैर समज करून घेणारा नाही , मी बोलेन तिच्याशी , हवे तर आई पण बोलेल " -बाबा 
"पण …."-आई 
"मला वाटते , आपण इथच थाबु यात या विषय वर "- बाबा 
आकशा ला चैन पडलाच नाही , विनीता मावशी , आई , इरा काय चाललाय नक्की . मी विचारतोच . त्यांना नाही आवडले तरी चालेल 
"आई , बाबा , रागावू नका पण नक्की काय चाललाय . मला काहीसे कानावर पडत होते . इरा चा विषय होता म्हणून मी विचारतोय . "
"आकाश तू यात पडू नको , तसे हि तुझ्या बाबांनी हा विषय थांबवला आहे "
"आई , पण मला कळलाच पाहिजे , कारण मला आवडणार नाही असे बाबा म्हणाले ., म्हणजे जर हा विषय पुढे गेला असता तर माझ्या पर्यंत येणार होता , मला सांगा काय ते ,"
" तुझ्या बाबा न च विचार "
"ठीक आहे आकाश , मी सांगतो तुला . तस हि कधी न कधी सगळे बोलायला हवच होते , फक्त इतक्या लवकर नको असे मला वाट होते "
"असे काय आहे नक्की बाबा "
"ऐक , आकाश . तुला तर माहितीये कि विनीता चा किती जीव आहे तुमच्या वर ते ."
"हो , विनीता मावशी , सख्खी नसली तरी त्या पेक्षा जवळची आहे आपल्याला . आई इतकाच तिचे प्रेम आहे आमच्या वर. पण त्याचे काय आता  "
 "मावशी एक वर्ष भर पुण्याच्या बाहेर जायचे म्हणतीये , जवळच . म्हणजे सातारा इथे . तुला तर माहितीये तिचे सासर आहे ते आणि समीर काका तिकडे पण एक कारखाना सुरु करायचा म्हणतोय . तर ती म्हणत होती कि एक वर्ष भर आम्ही तिकडेच राहणार आहोत , ती पण तिथेच क्लिनिक सुरु करेल , एखाद्या वर्ष नंतर परत येतील . त्या दोघान पण बदलाची गरज आहे . पण ती तुम्हा दोघांना खूप मिस करेल असे म्हणत होती "
"त्यात काय मग , सातारा जवळच तर आहे , आम्ही सुट्टी दिवशी जाऊ कि भेटायला तिला . "
"अरे तेच तर आकाश , जवळ आहे म्हणूनच मी तुझ्या बाबाला म्हणत होते कि "- आई 
"मी सांगतोय न त्याला , मला बोलू देत मग. विनीता म्हणाली कि तुअम्चय दोघा पैकी कुणी तरी एक जावू शकेल का तिच्या सोबत , शाळा वगैरे बघेल ती तिकडे  "
"काय ? असे म्हणाली मावशी . पण खरच ती का जातीये तिकडे , समीर काका येवून जावून करू शकतोच कि . म्हणजे कळतंय मला कि तिला आम्ही सोबत असावासे वाटतय , पण कसे शक्य आहे ते आणि आई तू काय आई इरा ला पाठवणार होतीस का , कसे शक्य आहे , किती लहान आहे ती आणि मला नाही चालणार , मी बोलतो मावशी सोबत आणि इतकाच असेल न तर मी  जातो "
"अरे आकाश , तुझी महत्वाची शाळेची वर्षे आहेत , इरा तशी लहान आहे अजून , एखादे वर्षे , अगदी नाही करमले तर २ महिन्यात परत येयील कि ती "
"नाही आई , शक्यच नाही .असे कसे तू म्हणू शकतेस . इरा ला सवय तरी आहे का ग , आपल्याला सोडून रहायची आणि आपल्याला तरी करमेल का ? मुळीच नाही , मी सांगून ठेवतोय आणि जायचे असेलच तर मीच जाईन . आणी मावशी सहज म्हणाली असेल तर तू इतके सिरीयासालि का घेतले आहेस . मावशी कधीच असे म्हणणार नाही . ती सहज बोलली असेल आणि तू मनावर घेतलेस . हा विचार काढून तक डोक्यातून आणि मावशी पण नाही जाणार मी आताच बोलतो तिच्या शी …"
"आकाश ,तू काही बोलणार नाहीयेस विनीता सोबत , फोन ठेव खाली . आणि माझ्या शी पण असे  का बोलतो आहेस "
"काय चुकले माझे आई , तू  मावशीला समजवायचे  सोडून , मला आणि बाबाला समजावत आहेस "
"खरे म्हणतोय ग तो , मी बोलेन आकाश , विनीता सोबत . ती सहजच म्हणाली असेल "
"म्हणजे तुम्हा दोघांना असे वाटतंय कि मीच तयार झालाय इरा ला पाठवायला आणि  तुम्हाला च काय ते विनीता बद्दल खात्री आणि इरा काय फक्त तुमची मुलगी आणि ह्याच बहिण आणि माझी कुणीच  नाहीये का ?"
"आई , असे आम्ही म्हणलाय तरी का ,  तू उगाच विषय भलती कडे नेवू नकोस "
"आकाश , तू खूप बोलतोयेस . ठीक आहे हा विषय इथेच संपला . मी सांगेन विनीता ला काय असेल ते "- आई 
"आई , तू एकटी का ? आपण सगळे बोलू न तिच्या शी . कदाचित ती सातार्याला जाण्याचा निर्णय बदलेल  सुद्धा . पण इरा इथेच राहील आणि अगदी वाटले तर मी जैन मावशी सोबत "
"आकाश , तू कुठे हि जाणार नाहीयेस "- आई 
"आई , इरा गेलेली चालेल आणि मी का नको "
"अरे कारण ९-१० वि महत्वाची वर्षे आहेत , म्हणून "- आई 
"आकाश , इरा नाही जाणार बेटा , मी आतच विनीत शी बोलतो "- बाबा 
बाबा आई चे काही न ऐकता मावशी सोबत फोन वर बोलले , पण त्यांच्या रूम मध्ये  जावून .  ते आले आणि न राहवूनच मी विचारले 
"काय म्हणाली मावशी ?"
"काही नाही रे आकाश , ती म्हणाली मी सहजच विचारले . बोलता   बोलता  विषय निघाला म्हणून . आणि तसा हि त्यांचे पण अजून नक्की नाही , आणि ती म्हणाली कि मला माहितीये कि हे असे अवघड आहे इरा ला किंवा तुला चल म्हणणे . त्ये पेक्षा सुट्टीला तिकडे किंवा आम्ही पुण्यात राहिलो तर अधून मधून मुले येत राहू देत . नेहमी येतात तशी । मला वाटते विनीता चे पण अजून काही जायचे नक्की  नाही आहे आणि माझे तिचे बोलणे झालाय आता. "
आकाश इतके ऐकून निघाला आणि तेवढ्यात आई अगदी हळू आवाजात जे पुटपुटली ते त्याला ऐकू गेले 
"मी इराचे इतके करून पण तू मला आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये उभे केलेस "
"असे काही नाहीये अग , मला महितोये कि इरा चे तू मुली सारखाच :- बाबा 
"सारखाच म्हणजे मुलगीच आहे ती माझी "- ऐं 
आकशा मागे वळला , आणि इतकाच म्हणाला मी ऐकले , आत मला सगळे पूर्ण सांगा . बाबा सांगायला तयार नव्हता , पण आई  मात्र म्हणाली उगाच नंतर गैर समज नको , तो मोठा आहे आता. आकाश ऐकत होता पण त्याला खूप टेन्शन आले होते कि हे लोक काय सांगणार आहेत 
आई सांगत होती आणि तो कानात प्राण आणून ऐकत होता 
"आकाश , तुला इरा पहिल्यांदा या घरात आली ते आठवते "
"हो आई "
"मग ऐक , ती या घराची मुलगी आहे , पण तुझी सख्खी बहिण नाही ."
"म्हणजे ?"
"सांगते आकाश . त्या आधी  एक दीड वर्षे आम्ही बाहेर होते . आणि अवि काका पण बाहेरच होता . आणि तो परत यायची शक्यता कमीच होता . अगदी निष्णात डॉक्टर होता तो . पण आम्ही इथली जबाबदारी घायला समर्थ आहे हे कळले तसा तो या सगळ्या पाशातून मुक्त झाला आणि जिथे गरज आहे त्याच  ठिकाणी सेवा करायची असे त्याने ठरवले . त्याला खर तर संसार , मुले या पाशात अडकायचे नव्हते . तुझा जन्म झाला न तेव्हाच मला म्हणाला , कि हा माझा पण मुलगाच आहे कि , माझे बाप म्हणून जे काही प्रेम द्यायचे असेल ते याला देईन . "
"आई , ते सगळे खरय , म्हणजे मला तसे माहित नाही , पण अवि काका मला आठवतोय . मी खूप लहान होतो तरी सुद्धा . पण  हे सगळे तू आता का ?"
"ऐक आकाश . तुला आठवत एकदा तू जुने फोटो पाहून म्हणाला होतास कि इराचे डोळे आणि अवि काकाचे डोळे सारखे  वाटतात , म्हणजे त्यातले भाव सारखे वाटतात . वाटणारच न कारण … "
"कारण, म्हणजे  तुला असे म्हणायचे आहे कि इरा अवि काकाची , आय मीन ती अवि काकाची मुलगी "
"पण आई कसे शक्य आहे , तू आताच तर म्हणलीस कि काका ला हे सगळे नको होते , मग इरा … आणि मला कसे नाही माहित आणि आज्जी ला , आणि आजोबाना ?"
"सांगते सगळे  सांगते . आजी , आजोबाना माहित आहेच . तू लहान म्हणून तुला सांगितले नाही आणि तशी गरज पण वाटली नाही "
"हो आकाश , आम्हाला तुला सांगायची गरज वाटली नाही कारण इरा आपलीच आहे . आणि तुमचे इतके प्रेम बघून तर आम्हाला खूप आनंद वाटतो "- बाबा 
"पण मग इअरचि आई ? तिला इरा नको होती "
" नाही नाही , तसे काहीच नाही दुर्दैवाने अवि काका आणि इराची आई दोघे पण या जगात राहिले नाहीत . इराच्या जन्म नंतर काही महिन्यातच ती गेली आणि अवि काकाला इरा ला साम्भायाला मदत म्हणून आम्ही त्याचे कडेच गेलो आणि इराचे लळा  लागला आम्हाला . पण तरी अवि काका परत यायला तयार नव्हता  आणि इरा ला पाठवायला सुद्धा . म्हणून थोडे दिवस आम्हीच राहलो आणि नंतर थोडे दिवस आजी आजोबा येणार असे ठरले होते "
"पण आई मला काही आठवत नाहीये कि , काका मला म्हणाला कि काकू आणलीये तुला किंवा बहिण आहे तुला "
"नाही राजा , तू लहान होतास आणि दुर्दैवाने तुझी काकू या घरात येवूच नाही शकली . कारण त्यांनी तिकडच  लग्न केले आणि ते पण आजी चा आग्रह म्हणून . तुझी काकू सुधा काका सारखीच होती , तिला पण आपली रुग्ण सेवा दुर्गम भागात करायची होती , म्हणूनच ते दोघे कदाचित एकमेकांच्या प्रेमात पडले . आजी च्या लक्षात आले एकदा , ती तिकडे असताना , आजी म्हणाली लग्न करा मग , तुमचे ध्येय एकाच आहे तर संसार त्याच्या आड येणार नाही . आधी काका ला पटले नाही . आणि शेवटी लग्नाला एक मान्यता आहे , ती फक्त प्रेमाला नाही . तरी हि काका लगेच तयार झाला नाही .  पण काय माहित , एकदा फोन केला आणि म्हणाला आजी आजोबाना कि लग्न करेन , पण इकडेच , अगदी सध्या पद्धतीने . काय झाले काय माहित , पण त्याने ठरवले . नंतर आम्हाला म्हणाला कि त्याला जेव्हा जाणवले कि संसार आपल्या कामाच्या आड नाही येणार तेव्हा ठरवले. आजी आजोबा गेले तिकडे  , काकाचे लग्न झाले. काका काकू इअक्दे येणार आणि मग एक छोटी पार्टी करायचे असे ठरले खरे . एक दोन महिने असेच गेले  . आपल्या काही जवळच्या नातेवाईक मंडळीना आजोबांनी पत्राने कळवले लग्न झाले म्हणून . पण काकू चा हे घर बघायचा योग आला नाही , तिला लगेचच दिवस गेले आणि प्रवास करणे शक्य नव्हते . खर तर तिने सगळाच अचानक घडले रे . पण काका म्हणाला इतक्यात कुणाला सांगू नका , कारण  तिची परिस्थिती नाजूक आहे . म्हणून मग मी आणि बाबा तिकडेच गेलो , तशी पण आजोबांची अट  पूर्ण करायची होती . इराच्या जन्म नंतर जेमतेम २ महिने जगली ती .  तू इकडे त्यामुळे आजी आजोबा दोघे एकदम येवू शकत नव्हते . एकेकटे येवून भेटून गेले . "
"काकू गेली , पण मग काका ?"
"आम्ही तिथेच होतो आकाश आणि काका एके दिवशी जवळच्या गावातून येत असताना , त्याच्या कार चा भीषण अपघात झाला ."- आईचा गळा  दाटून आला . आणि साहजिकच होते काका फक्त तिचा दीर नव्हता तर तिचा मित्र हितचिंतक आणि godfather होता . 
" फार काही आशा नव्हती . तरी आमचे प्रयत्न सुरु होते . शुद्धीत आला , तेव्हा वाटले कि सुटलो , हा परत आला . "- बाबा 
"हो रे आकाश , आम्ही दोघे पण तसे फार काही मोठे नव्हतो , वयाने . एक आई विना छोटे बाळ  आणि तुझा अवि काका असा मरणाच्या दारात . पण फार धीराचा तो . कदाचित  आम्हाला शेवटचे भेटायचे याच इच्छा  शक्तीने तो शुद्धीवर आला , काही तासच  . मला आणि तुझ्या बाबाला बोलावून घेतले आणि म्हणाल संसारात पडलो हे ठीक होते , पण या पोरी साठी वाईट वाटते , आई पण गेली आणि आता मी . पण तुम्ही आहात , माझी हि आठवण तुम्ही जपा . मला माहितीये कि तुम्ही आई वडिलांचे प्रेम द्यायाल . आकाश मला काही सुचत नव्हते रे . तुअल काय वाटले काय माहित , मला म्हणाला तू आई चे प्रेम देशील ग , पण आकाश हिला बहिणीचे प्रेम देईल का ग ? चुलत म्हणाले न कि उगाच महाभारत आठवते ग आणि कधी कधी वाटते तुम्ही किती पण केले तरी आई बापा विना पोर म्हणून तिला केवळ सह्नुभित मिळेल का ग लोक कडून . तसे नको ग व्हायला .  मला काय वाटले माहित नाही आकाश पण मी  अवि दादाला म्हणाले कि माझीच मुलगी असेल हि . पण तुला चालेल का कि तुझी नाही तर माझी मुलगी म्हणून जिला जग ओळखेल , तुझे अस्तित्व हिरावून कसे घेवू आम्ही . तुझा काका मला म्हणाला कि शक्य असेल तर आम्ही अवीची म्हणून नाही तर आमची म्हणूच इरा ला इकडे आणावे , त्याचे नाही तर आमचे नाव लावून . नाही म्हण्याचे प्रश्नच नव्हता . म्हणजे आम्ही जरी तिला अविदादा चे नाव लावले असते तरी तेवढच प्रेम दिले असते . पण अवि दादाची इच्छा  आम्ही पूर्ण केली   "
"आई , बाबा …  हे इराला ?"
"तिला कसे माहित असेल , जर आम्ही तुला सुद्धा नाही सांगितले . पण आकाश हे तुला आता माहितीये तर "
"खरे सांगू आई , धक्का बसलाय . पण मला इरा बद्दल जे वाटतंय ते तसाच आहे . कारण मला  ती माझी बहिण आहे हे च सत्य माहितीये आणि मला तेच स्वीकारायचे . पण आई एक विचारू ?"
"विचार कि "
"मी विसरू शकेन कि इरा सख्खी नाहीये , पण तू कधी हे विसरू शकशील ?"
"आकाश , तू काय बोलतो आहेस हे , मी इराचे तितकाच केलेय जितके तुझे , किंवा त्या पेक्षा जास्त काळजी आहे मला तिची "
"हो आई , काळजी आहे माझ्या पेक्षा जास्त . पण मला असे वाटते कि काळजी जास्त आहे इराची जबाबदारी म्हणून . अवि काकाच्या ओझ्या खाली ,  पण प्रेमाचे काय? "
"आकाश , मला हे अजिबात आवडले नाहीये तुझे असे बोलणे . इरा बद्दल मला काहीच वाटत नाही असे का वाटतय तुला . खरे सांगू तुझ्या नंतर इरा आली आणि आम्ही भेद जोवू नये म्हणून तुझ्या नंतर इराचा विचार केला आणि नंतर कधी तुझ्या साठी भावंडाचा विचार सुद्धा नाही केला आणि तूं … मला दुखावले आहेस तू आकाश "
"आई असे नाहीये , बाबा तू पण ऐक . मी असे नाही म्हणत आहे कि तुम्ही सावत्र पणा  करताय  पण कधी कधी असे जाणवतंय . म्हणजे आई मला  हक्काने ओरडते तशी इरा ला नाही. म्हणजे ती इरेराचे काही कमी करत नाही , पण त्या करण्यात कधी कधी असे वाटत कि आई टेन्शन मध्ये आहे . जणू चांगली आई होण्याचे बर्डन  आहे तिच्या वर . आई च्या काही काही वागण्याचा संदर्भ आता लागतोय मला . ती त्या जबबदारी खाली आदर्श आई होते हि , पण तरी "आई" नाही वाटत . "
"आकाश , इरा तुला असे म्हणाली ?"- बाबा 
"नाही बाबा . उलट तिला असे च वाटतय कि ती आईची आणि तुझी जास्त लाडकी आहे . बाबा आई सारखे तुला पण टेन्शन आहे का ?"
"माहित नाही आकाश , मी इतका विचार नाहीच करत , पण एक आहे कि तिला पहिले कि कधी कधी जीव गलबलतो , अवीची आठवण येते , आणि असे वाटते कि चुकून या भरात इरा ला सत्य समजणार तर नाही न "
"आई , बाबा , आपण हे इराला कधीच नाही सांगायचे . तसे हि अवि काका तिला आठवत पण नाहीये . तू खूप खुश आहे या आयुष्यात  आणि तिला या घरात सगळे तेच मिळेल जे तिला मिळायला हवे "
"आकाश , तू पण हे विसरून जा आणि खरच  मी  इराला मुलगीच मानते , विश्वास ठेव  " आई 
आई बाबा आणि आकाश काही वेळ नुसते बसून होते . आकाश म्हणाला बाहेर जावून येतो , तो बाहेर पडला पण खूप अस्वस्थ वाटत होते त्याला , इरा अवि काकाची मुलगी . त्याला आणखीनच भरून आले , अवि काका त्याला आठवत  होता आणि इराची आता खूप आठवण येत होती . कधी एकदा इरा भेतातीय असे त्याला झाले होते . पण त्याला एक वाक्य खटकले होते आईची "मुलगी मानते ", मानते म्हणजे ? मानायचे म्हणजे ती मुलगीच आहे न तिची . आई चे वागणे वाईट नाहीये , पण तरी पण चुकून कधी आपल्या बद्दल जे वाटते ते इरा बद्दल नंतर वाटेल का ? अर्थात आई नि इरा साठी खूप केलाय आणि करतीये ती आणि तिने सुद्धा अजून एका मुलाचा मोह टाळला आहेच कि . काही काळात नाहीये , उलट सुलट विचार . तो निमिष कडे गेला , पण  निमिष हि भेटला नाही . त्याला काय वाटले काय माहित तो सरळ विनीता मावशी कडे गेला . 
"अरे आकाश , या वेळी इथे ?"
"मावशी थोडा वेळ बसतो तुझ्या कडे ?"
"का रे बरे नाही वाटत आहे का ?
"नाही ग "
"मला माहितीये आकाश , तुझ्या आई चा आता फोन आला होता . तिला तुझी काळजी वाटतीय "
"मावशी , तुला सगळे माहितीये "
"हो , मला आधी पासूनच माहितीये . अवि दादा तर मला पण जवळचा होते  आणि माझ्या साठी इरा आणि तू  दोघे हि सख्खी भावंडेच आहात "
"मावशी , तू शिफ्ट  होणार आहेस का ग खरच . नको न ग जावू "
"ठरले नाही रे राजा , पण नाही जाणणार हा काळजी नको करू . मी आहे "
"मावशी , आई इरा ला तुझ्या सोबत पाठवणार होती न "
"अरे असे काही नाही , आणि मी सहज म्हणाले रे "
"पण , आई नि इराचे नाव का घेतले . का तुम्हा दोघींना पण ती आई विना पोर म्हणून कणव वाटतीय ,  प्रेम नाही "
"आकाश , असे काही नाहीये राजा . माझ्या तर मनात असे काही नाही "
"आणि आईच्या? "
"राजा , एक सांगू तिच्या पण मनात तसे काही नाही . तिचे इरा वर खूप प्रेम आहे , पण इरा अवीची मुलगी आहे हि ती नाही विसरू शकत आणि म्हणून जास्त जबादारीचे ओझे वाटते तिला कि कुणी असे म्हणून म्हणजे तुझे बाबा , आजी आजोबा यांनी कि ती कमी पडली किंवा  असे काही .  पण तुला सत्य स्वीकारणे सोपे आहे , तुला एकेच बहिण आहे , लहान पानापासून तुझे मन तिच्या वर बहिणी प्रमाणे प्रेम करताय . पण आपले मुल नसताना ते आपले म्हणून स्वीकारणे अवघड आहे . मी असे नाही म्हणत कि तुझ्या मनात ज्या शंका आहेत त्या चुकीच्या आहेत . तुझी आई माझी मैत्रीण आहे म्हणून मी सांगते कि ती इरावर प्रेम करेल , माया करेल आणि तिला तिचा हक्क पण देईल , पण त्याच वेळा हे पण सांगते कि कधी कधी ती हे नाही विसरू शकत कि तू तिचा मुलगा आहेस आणि इरा अविची मुलगी . हे सगळ खूप अवघड आहे बाळा , नात्यांचा हा गुंता , मनाचा गोंधळ . "
"मावशी , काका म्हनला म्हणून आई नि त्याचे नाव नाही लावला का ग इराला ?"
"हो आकाश , तुझा काका खूप हुशार आणि दूरदर्शी होता , जरी तुझे आई बाबा इराला प्रेम देतील हे माहित असले  तरी , इरा ला पण ते काका काकू आहेत हे कळेल तर ती त्यांच्याशी कशी वागेल असे हि वाटले त्याला . तुम्हा मुल पण कदाचित मोठे झाल्यावर कसे वागाल , एकमेकांशी कसे नाते संबध ठेवाल  असे वाटले त्याला  . ज्या कारणाने मुळात भांडणे होतील तेच अवि दादांनी टाळले. तू लहान आहेस अजून  , पुढे दुनिया दारी मध्ये  काय काय अनुभव येतात अरे . सख्खे  काय आणि चुलत काय "
"मावशी , मला कळातच नही ग , म्हणजे मला भीती वाटतीये कि मी कधी चुकून इरा शी , तिला कळेल असे वागणार नाही न , मला स्वताची आणि तिची खूप काळजी वाटतीये "
"आकाश , मी एक सांगू . विचार नको करू . फक्त एक कर , इराचा भाऊ आणि मित्र आहेस न , मग तसाच राहा . जस्ट बी  हर ब्रदर , लव हर ."
"मावशी , किती सोपे केलेस ग तू हे :)"
आकाश नि ठरवले कि मी इराचा भाऊ , मित्र आणि …आणि  मी आज पासून तिचं साठी अवि काका सुधा होईन . इरा आणि आजी परत आल्या , इरली काही कळले नाही आणि कळणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली . एक दिवस मात्र , आकाश आजी जवळ खूप रडला , आजी ला त्याने सांगितले कि तो आयुष्यात इरा ला कधीच अंतर देणार नाही , तिचे सगळे त्याच मायेने करेन जे त्याने भाऊ म्हणून करायला हवे आणि तितकच लाड करेन जे अवि काकांनी केले असते . आजी त्याला इतकाच म्हणाली कि  आकाश तू हे तर करच , पण तुझ्या आई ला समजून घे ती मनानी मोठी आहे पण शेवटी माणूस आहे , कधी कधी आपल्या मुलाचा मोह पडला तर , तिला समजून घे आणि  जाणीव करून दे तिला लगेच समजेल . तिचे पण इरा वर खूप प्रेम आहे 
आकाश वर्तमानात आला , आणि त्याला क्षणभर असे वाटले कि मधली सगळी वर्षे गळून पडली आहेत .  खरी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे , निमिष  च्या घरी पण . कधी तरी नंतर चुकून समजलाच तर गैरसमज नकोत म्हणून हि काळजी घेतली होती आई बाबा नि , पण हे चांगलाच झाले . हाच विचार करून आजीने अनु आणि तिच्या घरी सांगितले , पण तेव्हा   मात्र आमचे अंदाज चुकले . अर्थात बराच झाले म्हणा , लग्ना आधीच काय होते ते स्पष्ट झाले होते 
फोन च्या रिंग नि आकाश ची विचार शृंखला तुटली 
"हेलो , मी निमिष बोलतोय "
"हा बोल रे , काय विशेष ? कुणासाठी फोन केला आहेस नक्की "
"अरे , काही नाही सहजच . खर तर तुझ्या साठीच .  तू लग्न झाल्यावर २-३ दिवसात खरच परत जाणारेस ?"
"बातमी पोचली का तुझ्या पर्यंत , हो जाणारे म्हणजे सध्या तरी जायला हवे , बघू मग काय ठरतंय ते "
"मला वाटतंय मित्रा कि आता परत ये, खरच .  आम्हाला सगळ्यांना तू इथे हवा आहेस  अरे कमीत कमी मी इरा ची काळजी घेतो कि नाही  वॉच  ठेवायला तरी ये "
" नक्की , विचार करेन. झाली का तयारी सगळी   "
"सुरु आहे रे हळू हळू . तू बारा आहेस न "
"हो "
"बर मग ठेवतो "
"चालेल "
निमिष नि जसे समजून घेतले तसे अनु का नाही समजून घेवू शकली  , एकाच सत्यावर  वर माणसे  किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात  , विचार करतात . अनुला कळले मात्र कि इरा चुलत बहिण आहे , तिचा दृष्टी कोनच बदलला . जे काही आहे ते आपलाच आहे , तसाही तिला हॉस्पिटल मध्ये कुणी तिच्या पेक्षा वरचढ नकोच होते , अधिकाराने आणि कर्तृत्वाने सुद्धा आणि जेव्हा तिच्या लक्षात आले कि , इरा ला आम्ही इतक्या  केले तेव्हा तर तिने आई ला हेच पटवून दिले कि जे तुम्ही केले ते फारच काही तरी दिव्य आहे आणि जणू इरा वर उपकारच केले आहेत . 
त्याला त्याचे आणि अनुचे शेवटचे बोलणे आठवले 
"आकाश , तुझे मला पटत नाहीये , तू खरच परदेशी जाणार आहेस "
"हो , १ वर्षभर तर जावे लागेल "
"पण , मग मी काय करू इथे ?"
"तू , हॉस्पिटल सांभाळ न , नाही तर चाल माझ्या सोबत , एक वर्ष पण नाही , ६ महिन्याचा प्रश्न आहे "
"मला नाही जमणार , दोन्ही इथे तुला सोडून राहणे किंवा तुझ्या सोबत येणे "
"का ग ? तुला भीती वाटतीय का ?"
"कसली भीती ?"
"हेच कि तुझे इथले महत्व कमी होईल "
"म्हणजे ?"
"अनु मशुअ सगळे लक्षात येतेय . इरा माझी सख्खी  बहिण तर आहेच पण  एक सांगतो हे सगळे तीचेच आहे . तुला काय माहित ग आमच्या घराबद्दल "
"मी असे काही कधीच म्ह्नाले नाहीये "
"मी ऐकले आहे , तुझे आणि आईचे बोलणे आणि मगच बोलतोय . तू का आई ला हे पटवून देतीयेस कि इरा आज न उद्या या घरातुन लग्न होवून जाणार आहे , आणि हि हक्काची भाषा नव्हती आमच्या मनात . तुअल बरोबर कळले कि आई ला तू पटवू शकतेस "
"हे बघ आकाश , मी काय इरा ला घराबाहेर काढा असे नाही म्हणाले , पण शेवटी जे काय मिळवले आहे  ते तुझ्या आई बाबांनी च न . आणि इरा बद्दल सगळी कर्त्य्व्ये करत आहेत कि ते . जर मला तुला तुझे मिलावसे वाटले तर काय चुकीचे आहे , आणि समज तू डॉक्टर झाला असतास तर . आणि तसे हि इरा म्हणत्ये न कि ती हॉस्पिटल मध्ये काम करेल नाही तर बाहेर  सुद्धा जाईल एखादे वेळेस . तू उगाच गैर समाज करून घेतला आहेस . आणि तसे पण इरा अजून शिकतीये . ती आई वडील  नसून सुद्धा तिला कुटुंब मिळाले आहे . तू उलट तुझ्या आईचे आभार मानायला हवे आहेस "
"अनु , जास्त बोलातीयेस . तुला काय माहित ग , अवि काका बद्दल आणि आमच्या घराबद्दल . हे जे तुला  सासू ग्रेट वाटतीय न , ती आज डॉक्टर आहे कारण अवि काका होता , तो होता म्हणून तिचे माझ्या बाबाशी  लग्न झाले आणि माझ्या आजी आजोबा नि उभे केलेला हा डोलारा अवि काकांनी नवा रुपाला आणला त्याच्या सुरवातीच्या काळात . आई बाबा जो पर्यंत सक्षम होत नाहीत तो पर्यंत सगळे सेट करून ठेवले त्याने इथे आणि मग कसलाही मोह न ठेवता तो निघून गेला . त्याने इरा ला पण आई कडे त्याच विश्वासाने दिले, स्वताचे नाव मागे ठेवण्याचा मोह पण ठेवला  नाही ग त्याने . त्याला हेच नको होते , कि इरा कडे कुणी असे पाहावे . त्याला माझ्या आई बद्दल खात्री होती , पण  आम्ही मुले मोठी झाल्यावर कशी वागू या विचाराने त्याने हा मोह टाळला . आणि ऐक माझ्या आई ने जे केले ते फक्त कर्त्यव्य म्हणून नाही . आणि इरा पण अवि काकाची मुलगी आहे हि तिने नकळत दाखवून दिले , माझ्या प्रेम खातर तिने तू म्हणशील ते ऐकले , कसलाच मोह न ठेवता . रूम शिफ्ट केली , तुला जे जे आवडेल ते देवून टाकले . तिने तुला आपले मानले आणि तू ?"
"आकाश , मला आरोपी करू नकोस , मी बाहेरची आहे म्हणून आरोपि. मग हेच प्रश्न तुझ्या आई ला विचार कि जे मला विचारात आहेस . त्यांना का पटत होते मग माझे आणि इराचे काय , तिला जेव्हा कळेल तेव्हा ती मागेल्च कि 
 हक्क , बघू तेव्हा पण ती तुझ्या वर इतकाच प्रेम करते का आणि सोडून देईल का तिचा हक्क तुझ्या साठी "
"अनु , तू असा इतका कडवट विचार करत असह्सील असे मला वाटत नव्हते . म्हणजे आपण सुखात राहावे , यशस्वी असे प्रत्येकाला वाटते , आणि तसे होईल इतके आहे आपल्या कडे , पैसा , बुद्धी आणि संधी सुद्धा . आणि स्पष्टच सांगतो , माझ्या आई ला जेव्हा आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे हे माहितीये मला , तू सांगायची गरज नाहीये . हो एखादे वेळी तिला तुझे पटले पण असेल , पण इरा २ महीन्याची असल्या पासून सगळे केलेय तिने  इराचे आणि इरा साठी स्वताच्या अजून एका मुलाचा मोह टाळला आहे तिने , कमीत कमी तो एक मोठा त्याग आहे तिच्या नावावर , ज्या साठी मी तिला हजार  वेळा माफ करेन , कळले . तू हे सगळे डोक्या तून काढून टाक . आपण एक वर्षभर बाहेर जावून येवू किमान सहा महिने , सगळे ठीक होईल मग "
"आकाश , एक मिनिट . एक तर माझे काही चुकले आहे असे मला नाही वाटत . अगदी वेळ आली तर इरा ला तिची वाटणी मिळेलच कि , तू का घाबरतोस . आणि तिला कळेल न तेव्हा तीच मागेल बघ "
"अनु , आता शेवटचे ऐक , जे काही आहे ते तिच्या बाबाचे म्हणजे अवि काकाचे च आहे , उलट तो काही न घेत गेला , त्यांनीच माझ्या आई बाबाला , विशेषत: आई ला दिलाय सगळे जे त्याचे आणि नंतर इराचे आहे . माझाच काही नाहीये त्यात , कळले . आणि एक इरा ला हे कुणी हि सांगणार नाहीये कधीच , आमच ठरले आहे तसे , सगळ्यांचे "
"तुमचे ठरलाय न , मी माहिये त्यात . अनु मला असे वाटते कि लगेच असे नाही , पण कधी तरी इरा ला सत्य कळायलाच हवे . तिला पण कळू दे कि ते , तिला असे न सांगणे हा तिच्या वर आणि तिच्या आई वडिलांवर अन्याय आहे "
"अनु , तू न्याय आणि अन्यायाची भाषा नको करूस . हे तू तिला सांगणार नाहीयेस .  कधीच . आणि जर तू हे करणार असशील , आणि तुझ्या डोक्यातून हे सारे जाणार नसेल तर …।"
"तर काय , आकाश , आणि मी तुला सांगतीय कि माझे काय इरा शी वैर नाहीये , पण सत्य कडे पाठ  जागल तुम्ही लोक , आणि एक तू कुठे हि जाणार नाहीयेस , आपण इथेच राहतोय , तुझे परदेशी जाणार तू डोक्यातून काढून तक "
"इरा माझी बहिण आहे आणि हेच सत्य आहे , त्य्झासाठी नसले तरी , मी राहीन ते च सत्य स्वीकारून आयुष्य भर , आणि ते पण आनंदात . आणि आपण जातोय कमीत कमी ६ महिने तरी  आणि मला वाचन दे कि तू इरा ला कधीच काही सांगणार नाहीस "
"वचन वगैरे काय , कोणत्या जमान्यात जगता रे तुम्ही लोक , उद्या काय प्रसंग येतील काय माहित . कमीत कमी तिचे लग्न होईल तेव्हा तिच्या होणाऱ्या  साथीदाराला तरी सांगणार न तुम्ही , मला सांगितले तसे , हे सत्य . मग तेव्हा तर तिला कळेलच कि , मग या वचनाचा काय उपयोग . आणि लक्षात ठेव तिला जर कुणाकडून कळले किंवा तेव्हा  कळले न तर तिला वाटेल तू तिचा विश्वास घात केलाय , आणि ती बघ तुझा राग राग करेल "
"अनु , तू काहीही उगाच माझ्या मनात भरवू नकोस, हे बघ तुला माझे म्हणणे मान्य आहे कि नाही  तेवढे संग ते सांग :
"नाही मान्य आहे , दोन्ही म्हणणे , इरा ला आज न उद्या सत्य सांगावे लागेलच आणि वेळ आली तर मीच सांगेन आणि दुसरे म्हणजे मला परदेशी नाही यायचे आहे , तू मी तुला जावू देईन "
"ठीक आहे तर , मग हेच जर तुझे ठरले असेल तर , आपले  झालेले बरे "
"आकाश , हे काय बोलतोयस तू , पंधरा वीस दिअव्स वर लग्न आहे आपले आणि तू ,… "
"माझ्या समोर  तू दुसरा काही पर्याय ठेवला नाहीयेस "
"मी ठेवला नाहीये ?, आकाश तूच जागा हो , ज्या इरा साठी तू मला नाही म्हणतोयेस न , तीच एक दिवस तुझ्या कडे पाठ फिरवेल कि नाही बघ , खरे कळल्यावर . अरे सख्खी  भावंडे जिथे आपापल्या संसारात अडकल्यावर   , एकमेकांना नकळत पाठ फिरवतात तिथे बाकीच्यांचं काय ?"
" अनु , भविष्यात नशिबाने काय वाढून ठेवले आहे मला नाही माहित , पण आज काय करायचे तेच  फक्त माझ्या हातात आहे . आणि आता मला नाही वाटत कि आपण एकत्र  राहू शकू , माया आणि तुझ्या विचारातच फरक आहे . कदाचित तू तुझ्या जागी बरोबर असशील हि , पण मी नाही अश्या विचारण सोबत राहू शकत . "
"आकाश अ, तू  आहेस मला , मी तुला आणि मुख्य म्हणजे इअर ला कधीच माफ नाही करणार . तुम्ही काय स्वताला जागा वेगळे समजता  का रे ? तुमचे ते प्रेम आणि आम्ही काय ? मी पण प्रेम केलेच तुझ्या वर पण , तुला कळलच नाही "
"अनु , आम्ही जगावेगळे नसू हि पण कदाचित , पण आमच्यात हे ऋणानुबंध नियतीनी जोडले आहेत , मला जेव्हा काही माहित नव्हते न तेव्हा पासूनच मी  आणि इरा  इतके जवळ आहोत ,  आमचे नाते आमच्या पुरते आहे आणि ते कुणी समजावून घेतले नाही तरी चालेल , पण कमीत कमी त्याचा आदर करावा इतकीच माझी अपेक्षा होती . आणि प्रेमाचे म्हणशील तर तू केले असशील माझ्या वर प्रेम , मी नाकारत नाही . मी स्वीकारले पण होते . पण तू जर माझ्या इरा बद्दलच्या भवनाचा आदर केला असतास तर कदाचित मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार . जावू दे , आपण हे जुळवू नाही शकत आता , मला माफ कर , आपण इथेच थांबू . आणि एक कारण विचारले तर हेच माझ्या परदेशी जाण्याचे सांगू , जर माझ्यावर प्रेम केले असशील तर इतक ऐक माझे . प्लीज "
"ठीक आहे आकाश , तू तुझ्या घरी आणि माझ्या घरी पण तूच सांग . पण एक सांगू आयुष्य असे एका नाट्य साठी कधीच थांबू शकत नाही . माझे पण नाही आणि तुझे पण आणि इराचे पण . एकटे जगणे अवघड आहे , तू एकटा पडशील आज न उद्या  "
"अनु , प्लीज . "
अनु निघून  गेली नि आकशा एकटाच मागे राहिला , आपण हे असे करायचे ठरवून आले नव्हतो . अनु ला केवळ   होता . दोघानीच काही दिवस परदेशी राहणे , तिला आवडेल असे वाटले होते आणि त्यामुळे   सगळे व्यवस्थित होईल असे वाटले होते , पण काही तरी भलतेच झाले . आता हे सगळ्यांना सांगयचे म्हणजे आणि इरा ला काय सांगू , तिला तर धक्काच बसेल . आई बाबा तरी समजावून घेतील का 
आकाश घरी आला  तर , घरी आधीच बातमी लागली होती , अनुच फोन येवून गेला होता . 
"आकाश , आम्हाला तुझ्या सोबत बोलायचे आहे . इरा बेटा  तू थोडा वेळ विनीता कडे जा "
"आई , पण मला एकदा दादू शी बोलू दे न ग "
"बरे ठीक आहे , तू बोल त्याचाशी अन जा मग . "
"म थाबते न ग आई , प्लीज "
"इरा , तू थाब्लीस तर हरकत नाही , पण तू अजून लहान आहेस बेटा "
"ठीक आहे आई , पण दादू काही चुकीचे करणार नाही ग , त्याचे ऐकून तरी घे "
"इरा , आम्ही शांत पणे  बोलू  "
"दादू , तू खरेच परदेशी जातोयेस का रे ? जाने गरजेचे आहे का ? नंतर जा न ? लग्न करून काही दिवसांनी . नाही तर काही वर्षांनी जा . अनु खूप गोड मुलगी आहे  रे , ती आणि तू मस्त आहात आणि आई ला पण ती किती आवडते न आणि मला पण "
"इरा , राजा तू काळजी नको करू . बघू काय होते ते . आणि माझ्या वर विश्वास ठेव ग तू , जे काही होईल त्यात आपले सगळ्यांचे भले आहे "- आकाश 
"माझा विश्वास आहे रे तुझ्या वर , तू चुकीचे काहीच करणार नाहीस . मी जाते , पण मी परत येयीन तेव्हा सगळे आनंदी झालेले असू दे . मला फोन करा "
"इरा, निघ तू , मी फोने करते तुला "- आई 
इरा गेली आणि आकाश अजूनच एकटाच पडला 
"आकाश ,  हा काय वेडेपणा आहे "- आई 
"वेडेपणा काय आहे त्यात अ, हे बघ मी काय असे ठरवून गेलेओ नव्हतो . पण तिचे बोलणच असे काही होते कि माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता "
"आकाश , अरे फक्त काही दिवसांवर लग्न आहे आणि आता तू म्हणतोयेस कि , त्या लोकांचा तरी विचार कर :- बाबा 
"बाबा , एक विचारू तुला , अनु वर विश्वास आहे आणि माझ्यावर नाही"
"असे नाहीये आकाश , पण तुमचे वायाच असे काही , माणूस टोकाचा विचार करतो एकदम . तू काय किंवा अनु काय . आम्ही मोठ्या माणसांनी मध्ये पडायला हवे न . इतके  महत्वाचे निर्णय तुम्ही आपापले घेवून कसे चालेल "
"आई , एक वेळ मी परदेशी नाही जाणार , पण अनु नि इरा ला काही सांगायचे नाही असा शब्द तर दिलाच नाही पण उलट तिला सांगणे गरजेचे आहे हे मला पटवून देत होती , ती कधी तरी इरा ला सांगेल या  दडपण खाली  खाली मला आयुष्य भर जगायचे नाहीये . अनु वाईट नाहीये , पण महत्व कांक्षी तर नक्कीच आहे , तिला जे हवे आहे ते मिळवण्या साठी ती गोष्टीचा उपयोग जर आयुष्य भर करत राहील , तर आमचे नाते फुलेल का ? त्यातून केवळ आनंद मिळेल का आई ? तूच सांग ?"
"अरे असे काही नाहीये, अरे या वयात असे वाटते , आपल्याला सगळे यश , पैसा , प्रसिद्धी , मन सगळे मिळावे म्हणून . हळू हळू आपण मोठे होते आणि  बदल होतात "
"मान्य आहे आहे कि माणूस वय वाढेल तसा ,बदलतो  पण तरी त्याचे मुल स्वभाव नाही बदलत आणि मुख्य म्हणेज मी तिला म्हणताच नाहीये कि माझ्या इतके प्रेम तिने इरा वर करावे . फक्त माझ्या भावनांचा आदर करावा . मला असे वाटले होते कि आम्ही थोडा काळ जर बाजूल अराहू , तर आमचे नाते रुजेल आणि तिच्या मनातले हे सगळे जर बाजूला पडेल . पण तिला काही मान्यच नाहीये . बर इथेच राहायचे म्हंटले , तर तिच्या आजच्या बोलण्यावरून इरा ला कधी कधी तिच्या वागण्यातून काही तरी जाणवेल याची मला भीती वाटतीये . अनु ची तेवढी क्षमता  नाहीये ऐं . खर तर तूच तिच्या विचारणा खात पाणी घातलास . तुझी पण चूक आहे . तू का नाही तिला ठणकावून सांगितले . ती बोलली आणि तुला पटले . मला वाटतय कि विनीता मावशी सोबत तुझे या वरूनच वाढद झाले आणि तिने हॉस्पिटल मध्ये लक्ष काढून घेतले . आता मला लक्षात येतेय सारे . हे असे इराला रूम शिफ्ट करायला लावणे, इर्रीन्ग्स घेणे ,हॉस्पिटल मध्ये आपले महत्व वाढवण्याचे प्रयत्न आणि आई तू हे सगळे ऐकलस . मी इथे नव्हतो , तू का इराला सांगितले नाही कि रूम बदलायची नाही आणि अनु ला पण तेव्हाच समाज दिली असतीस तर बरे झाले असते . तू माहित असून दुर्लक्ष केलेस  अनु बाहेरची आहे , पण तू , तू तर आमची आहेस न , मग "
"आकाश , तू आई शी असे बोलू शकत नाहीस "- बाबा 
"खरेय , आईशी च का , तुम्ही पण तर होता कि इथेच . तुम्ही तर कधीच कशात लक्ष घालत नाही . म्हणजे प्रश्नच नको , समजा जर आई चुकत असेल , तर तुम्ही तिला का नाही सांगितले . इराच्या जबाबदारीचे ओझे जितके आई वर आहे , तितके तुम्ही कधीच घेतले नाहीत . जबादारी नको , म्हणून निर्णय  नको , आपण आणि आपले हॉस्पिटल बस . निर्णय सगळे आजी आणि आई कडे "
"आकाश , बस . खूप बोलला आहेस . आम्ही ऐकून घेतोय म्हणून . तू काय आम्हाला प्रश्न विचारणार का रे आता ? आई वडील आहोत आम्ही तुझे "
"आणि विसरू नको आई , इराचे पण आहात "
"ते आम्ही नाही विसरलोय आकाश , मी हि नाही आणि तुझे बाबा पण नाही . तूच पूर्व ग्रहणे बघ्तोयेस आमच्या कडे . इराचे लय कमी केलेय किंवा करतोय रे आम्ही का तू एकट्यानेच मक्ता घेतला आहेस तिचा . अनु घरात नवीन येणार होती म्हणून चार गोष्टी तिच्या मनासारख्या केल्या तर काय बिघडले आणि इरा सख्खी  बहिण असती तर जशी वागली असती तशीच  वागली म्हणून मी काही नाही बोलले . "
"पण , अनु तशी वागत नव्हती न , तिने लगेच वागणे बदलले , ते नाही दिसले तुला "
"हो दिसले , पण मला इतके काही वाटले नाही त्यात . आणि तसाही मी आणि तुझे बाबा समर्थ आहोत इराची काळजी  घायला . तुला आणि अनु ला यात पडायचे कारण नाही. आम्ही अवि दादांना वाचन दिले होते , आमचे माही बघून घेवू . आणि एक आता आपण अनु कडे जातोय आणि सगळे सुरळीत करू  . माफी मागा  , दोघे एकमेकांची आणि मोठ्या मनानी एकत्र या परत . "
"आई , ते शक्य नाही . ती किती कडवट विचार करते, ते काळात नाहीये का तुला . आणि मला नकोय हि अशी मुलगी आयुष्यात . ती इराला नक्की सांगेल एखादे दिवशी नाही तर मला तलवारीच्या टोकावर धरेल आयुष्य भर . भांडणे च होतील यातून , मनस्ताप होईल तिला पण आणि मला पण , कशाला हा अट्टाहास ."
"आकाश , अरे कोणतीही मुलगी तुझ्या आयुष्यात आली तरी हे असे होणारच , तू असा किती काळ  एकटाच राहणार आणि आज न उद्या इरा ला पण साथीदार मिळेलच कि तिचा , मग ?"
"तेव्हाचे तेव्हा बघू , मला समजून घेणारी अशी एखादी मुलगी असेल कि , तिह्याशी लग्न करेन मी , पण आत अनु शी नाही . आता लगेच मला हा विचारच नकोय .  प्लीज "
"आणि इराला काय सांगशील आकाश ?"- बाबा 
"सांगेन जे सगळ्यांना सांगितलाय तेच , परदेशी जाण्य वरून मतभेद झाले म्हणून आणि अनुचे म्हणाला तर ती खूप प्रक्टिकल आहे , she will move on easily . "
"इतके सोपे नाहीये आकाश , खेळ नाहीये हा , मनात आला मांडला आणि मनात आले मोडला . आम्ही इतके दिवस तुम्हाला मोकळीक दिली हेच चुकले , लगेच लग्न झाले असते  तर बरे झाले असते . हि नसती भानगड "
"आई , इतके सगळे सांगतोय मी तुला अनु बद्दल आणि तरी पण ,… तू तरी मला समजावून घेशील असे वाटले होते आणि लग्न होनी आधीच झाले हे बरे झाले उलट . कधी कधी अशी नाती तुटतात हेच चांगले आहे . मी शेवटचे सांगतोय मी  हे लग्न मोडलाय , मला काही नाही बोलायचे यावर "
"आकाश ,आताताई पण करू नको , शांतपणे  विचार कर . आम्ही जातोय अनु कडे , आणि लग्न होईल त्याच तारखेला कळले .  माझा शब्द अखेरचा आहे . आणि इरा आमची जबादारी आहे , ते ओझे तू उचलू नकोस "
"आई , मग माझे पण ऐक , मी हे लग्न करणार नाही हा माझा पण शब्द आहे , आणि आता खरच आता तुम्हीच इराची जबाबदारी पार पाडा . मी तसाही पुढच्या महिन्यात परदेशी जाणार होतो , ते नक्की आहे. "
"आकाश , तू  तसा लहान आहेस अजून  .  पूर्ण आयुष्य आहे तुझ्या समोर आणि हा काय वेडेपणा आहे .  किती समजवायचे  रे तुला . आज अवि दादा असता तर , आणि इरा त्याचीच मुलगी असती तर हे असे काय सगळे घडलच नसते . त्या पोरीच्या नशिबात काय आहे कुणास ठावूक , आई गेली , वडील गेले आणि आता तिच्यामुळे  तू लग्न मोडतोयेस , त्या पोरीला जर चुकून कळले तर काय वाटेल तिला , याचा तरी विचार कर . " 
"आई एक तर , इराला मध्ये घेवून दोष तिच्या माथी मारू नकओ , आणि तिला हे कधीच कळणार. तिच्या शी तुम्ही नका बोलू मी सांगेन  काय असेल ते आणि अवि काका जगाला असते तर बरे झाले असते असे वाटायला लागलाय मला आता . त्याला जर कळले असते न कि तुम्हाला इतके ओझे वाटतय , तर जगाला असता बिचारा , आपल्या पोरी साठी "
"आकाश , इतके वाईट आहोत का  रे आम्ही , काय असे कमी केलाय रे आम्ही तिचे आणि तू काय असे करणार आहेस वेगळे . तुला नाहीच कळणार , आई बाप होणे किती  अवघड आहे ते  पण "
"ते पण काय , एका  अनाथ मुलीचे हेच न . ऐक मग ती अनाथ कधीच नव्हती , हे जे सगळे आहे न तिचेच आहे हक्काचे , आपण सगळ्यांनी फक्त सांभाळले इतकाच , आणि आता तुम्हीच तिची काळजी घ्या कारण मी वर्ष भर तरी नाहीये इथे . "
इरा संध्याकाळी उशीरच आली , घरात सगळे सामसूम होती . ती आकाशाच्या रूम मध्ये गेली 
"दादू , तुझे हे नक्की आहे , तू लग्न नाही करत आहेस  "
"हो नक्की आहे आणि ऐक इरा पुढच्या महिन्यात मी जातोय एक वर्ष  साठी "
"आणि मी ? एकटी राहू इथे "
"एकटी का बाळा , आई आहे  बाबा आहेत , मावशी आहे ,निमिष आहे .  हा आत आजी नाहीये , पण हे सगळे आहेत कि . आणि आपण तर टच  मध्ये राहूच कि . आणि सुट्टीत तू तिकडे ये आणि मी  तरी . वर्षभर  जाईल बघ पटकन "
"पण तू लागा का मोडलास , मला तुझे कारण नाही पटले , नक्की काय झालाय ?"
"तेच कारण आहे इरा , माझ्या वर विश्वास ठेव . हा विषय थांबवू आपण इथेच . आणि मी जर वेळ निम्सिः कडे जावून येतो हा "
इरा ला खरे तर पटतच नव्हते , आई बाबा पण तेच  सांगत आहेत . आई ला आकाश चे वागणे पटले नव्हते , आणि परदेशी जाने तर अजिबातच . वाईट ह्याचे वाटत होते कि त्याने जणू आरोपात्रच दाखल केले होते तिच्यावर आणि बाबावर सुद्धा . हि अशीच कटुता मनात राहिली आणि आकाश परदेशी गेला . एक  वर्षे झाले तरी परत यायची चिन्हे नव्हती ,  इरा डॉक्टर झाली , हॉस्पिटलचे काम बघू लागली , पुढचे शिक्षण पण सुरु झाले , त्याला जाणवत होते कि आई बाबा आणि ती आता जास्त जवळ आले आहेत , त्याचा पासून दुरावालेले  तीनही जीव एकमेकांना आधार देत जगात आहेत ,, आणि म्हणून आकाश नि तिअक्दे राहणे वाढवले . पण या मध्ये त्याचे आणि आई बाबा मधले  वाढतच राहिले . तो कडवट पण अजून तसाच  होता . चू होती पण कुणाची , आणि माफ मागायची तर कुणी . या सगळ्या काळात हे कुटुंब जोडून ठेवले ते इरा नि  . आई बाबा नि विचारले नाही तरी  आकाश चे सागेल तपशील ती त्यांना सांगायची , त्यांचे सगळे आकाशाला सांगायची . निमिष नि मात्र आकाशाला वाचन दिल्या प्रमाणे , इराला आणि आई बाबान हि लागेल ती मदत केली होती .  हसत खेळत ठेवण्यात त्याचा खूप मोठा  हात होता . जी इरा त्याला छोटीशी बाहुली वाटत होती , त्याच बाहुलीच्या प्रेमात तो पडला होता , अगदी सहज , नकळत आणि त्याला हा  खरा भातुकलीचा डाव तिच्या सोबत मांडायचा होता , पण आकशा नि अनुचे असे झाल्या पासून त्याला जाणवत होते कि इरा हे सगळे टाळतिये. तिला मी आवडत असलो तरी , तिला ते मान्य होत नाहीये . आकाश  सेटल होवू दे , मग मी विचार करेन असे तिने नकळत त्याला सांगितले होते . आत फक्त आकाशच होता जो तिला समजावू शकत होता . आणि आकाश नीच तिला  लग्नाला तयार केले आणि इथे आला तिच्या हट्टा  साठी . 
 बघता बघता इराचे लग्न पार पडले , ते पण अगदी विनाविघ्न . इरा नि अगदी हुशारीने आकशा कडून एक वचन घेतले कि तू पुढच्या ६ महिन्यात परत येयील . आणि त्याला ते द्यावाच लागले . आकाशाचा जायचा दिवस येवून ठेपला . पण तो परत येणार असल्यामूळे  सारेच खुश होते . इरा आणि निमिष दोघे त्याला सोडायला जाणार होते . आकाश परत येवून त्याच्या जुन्या सहकार्यांना जोइन करणार होता . 
आकाश , इरा आणि निमिष तिघे विमान तळावर होते , आपापल्या विचारात 
निमिष खुश होता , त्याचा मित्र परत येत होता आणि त्याचे प्रेम त्याला मिळाले होते . आकाश पण आनंदात होता , त्याच्या लाडक्या इराला तिचा  जोडीदार मिळाला होता आणि तो पण निमिष , म्हणजे  काळजीच मिटली , आणि मुख्य म्हणजे इरा तितकीच जवळ राहणार होती त्याच्या आता . निमिशनी तिच्या प्रेमात पडावे याच्या इतके छान काहीच नवते . आणि इरा , ती खुश होती कारण निमिष सोबत लग्न झाले म्हणून , या हि पेक्षा आकाश परत येणार म्हणून आणि त्या हि पेक्षा आई बाबा आणि आकाश एकतर आले म्हणून . 
"निमिष , मी येतोय लक्ष ठेवायला तुझ्या वर . इरा कुठाय रे ?"
"अरे ती फोन वर बोलतीये "
"मित्र खरे सांगू , खूप हलके वाटतय  रे मला . आपल्या माणसात आल्यावर खूप बरे वाटतंय . ६ महिन्याच्या आतच मी येयीन इथे . इरा मुळे  मी आणि आई बाबा एकत्र आलोय . आणि छान काय आहे माहितीये , आम्हा दोघांना समजून घेणारा तू आहेस तिच्या आयुष्यात "
"काळजी करू नको आकाश,इराला मी कधीच काही नाही सांगणार नाही "
"काय रे माझ्या बद्दल  काय बोलताय तुम्ही "
"काही नाही , तू चिडलीस कि काय करायचे ते सांगतोय ग तुझ्या निमिषाला "
"असू दे . निघ तूं आता , वेळ झाली बघ . आणि बोलूच आपण , आणि ये परत लवकर मी खूप वाट बघतोये आणि मी रडायच्या आत पळ "
"इरा … काळजी घे , मी येतोच आहे "
निरोप छोट्या काळासाठी असेल तरी तो घेणे जड जाताच नाही का 
"इरा , तू रडतीयेस. अग  तो येयील परत  "- निमिष 
"नाही रडत नाहीये मी . एक सांगू तुला , फक्त तुझ्या आणि माझ्यात च. आज मला खूप बरे वाटतय , आकाश परत येतोय , आई बाबा आणि तो आता परत एकत्र येतील . आणि सगळे छान होईल . आज तो मनावरचे एक ओझे कमी करून गेला आहे आणि मी पण एक ओझे कमी केलाय . माझ्यामुळेच ५ वर्ष पूर्वी सगळे घडले . आई बाबा दुरावले त्याला आणि अनु पण गेली त्याच्या आयुष्य मधून  "
"इरा , असे काही नाहीये , तुझा काय संबध "
"माझ्या काय संबध ते मलाही माहितीये आणि तुला हि न निमिष "
"म्हणजे "
"मला सगळे कळले आहे , माझ्या बद्दल कि मी , म्हणजे माझे बाबा म्हणजे आकाश चे अवि काका आणि आकशा माझा … खर  तर तो माझा सगळे काही आहे . भाऊ , मित्र  , आणि बराच काही . "
"इरा पण तुला हे सगळे कसे कळले आणि कधी आणि माहित असून हि तू कुणालाच का नाही  ?"
" आकाश गेला खरा , पण १ वर्षे झाले आणि अनु अचानक भेटली , तिचे लग्नाचे परत बघत होते . मला राहवले नाही , मी तिला विचारले काय झाले ते . ती म्हणाली तुझ्या भावालाच विचार . मी खूप हट्टाला पेटले , जेव्हा मी तिला म्हणाले कि तुझ्या मुळे  आकाश आम्हाला दुरावला तेव्हा तुला मला खरे सांगावेच लागेल तेव्हा मात्र ती म्हणाली कि माझ्या मुळे … सगळे … माझा विश्वास बसे न , मग विनीता मावशीला विश्वासात घेतले आणि तिच्या पाशी बोलले मी कारण मला आई बाबा , हो आई बाबच आहेत ते माझे ,  दिला तरी । त्यांना मला दुखवायचे नव्हते अजून आणि आकाशाला तर नाहीच नाही . मग मावशीला म्हंटले कि मला कळले आहे हे त्यांना सांगू नको . त्यांनी जे जीवापाड जपले . केवळ माझ्या साठी ते जपल्याचे समाधान  आणि सुख मला हिरावून नाही घायचे आहे कधीच . काही गोष्टींच्या न कळलेल्या चांगलाय नाही का !. आणि खर सांगू , अरे ज्यांनी मला जन्म दिला ते मला आठवत हि नाहीयेत , मला आईचा स्पर्श आठवतो तो या आईचाच , बाबांचा आधार वाटला तर याचा बाबांचा आणि कुटुंब आकाश शिवाय कसे पूर्ण होईल माझे . हेच माझे कुटुंब आहे . ते आयुष्यभर धापडत राहिले , मला सत्य कळू नये म्हणून , कारण त्यातच हित होते माझे आणि त्यांचे पण आणि मला आता हि कसरत आयुष्यभर  करायची आहे :) , प्रत्येक जण  आयुष्यात आपले असे काही   घेवून येतो आणि  आपल्या माणसासाठी जर कहे ओझे उचलावे लागले तर ते उचलण्याचा एक आनंद असतोच कि , आणि आत माझी turn आहे न . आणि मला यात मदत कर , जर कधी मी कमजोर पडले चुकले तर , तू माझा कान पकडून मला आठवण करून दे . मी खूप नशीबवान आहे कि इतके प्रेम करणारी माणसे  माझ्या अवती भोवती आहेत . आणि खरे सांगू आईचे प्रेम आहे रे माझ्यावर ,नेहमीच होते . आकशाला हि कळेल तिची बाजू एक दिवस. ती जर कधी चुकली असेल तर आम्ही तिला समजावून घ्याला हवे, कारण आमच्या फार चुका पोटात घातल्या आहेत तिने . "
"इरा , मी आहेच ग , पण तुझे कौतुक वाटते मला . आणि तुला हे माहित असूनही …. "
"जे होते  ते चांगल्या साठीच . तुला एक गम्मत सांगू ."
"काय ग ?"
हे माझे रहस्य माहित असलेली अजून एक व्यक्ती आहे , जी आकाश सोबत परत येणार आहे आणि हे आकशाला  पण माहिती नाहीये . तुला काय वाटले तू एकटाच आहेस का समजूतदार या जगात जोडीदार म्हणून "
"म्हणजे ?"
"म्हणेज काय ?  आयुष्य सोपे आहे . त्रिकोणा  पेक्षा चौकोन चांगला नाही का ?"
इरा मनमोकळे पाने हसली , आणि निमिष पण . काही दिवसापूर्वी ती आकाशाला घेवून पुण्याच्या प्रवासाला निघाली होती आणि  आता याच जागी  तिनी आकाश , निमिष , आई बाबा , विनीता मावशी आणि …जे त्यांच्या नात्याला समजून घेतील अश्या सार्यांना घेवून एक नवीन प्रवास सूर करत होती . एक गोष्ट त्यांची पण संपली पण थांबली  नाही :)


समाप्त  






-- 
Sheetal Joshi 
Cell No : 9423208623

Friday 26 June 2015

एक गोष्ट त्यांची पण : भाग सातवा

एक गोष्ट  त्यांची पण : भाग सातवा 

आई आणि इरा हॉस्पिटल  मधून अक्षरश: पाच मिनिटात आल्या  आणि आकाशाची विचारांची मालिका थांबली . वातावरण हलके राहावे म्हणून असेल किंवा मुळातच स्वभाव म्हणून असेल  पण इरा नि गप्पा सुरु ठेवल्या होत्या . तसा हि निमिष गाडी चालवत असल्यामुळे तिला चिक्कार निवांत वेळ होता 
"५ वर्षात पण खूप बदल वाटतोय ग मला इकडे "- आकाश 
"म्हणजे काय , अरे ५ वर्षे हा मोठा काल  आहे , दोन वर्ष मध्ये generation gap जाणवते आज काल, हो किनई ग आई  "-इरा नि आई ला हि संभाषणात आणण्याचा प्रयत्न केला 
'आजूबाजूला बदल होत असतातच आकाश , आपण स्वीकारतो कसे त्यावर आहे सगळे . मी एका छोट्या घरातून आणि छोट्या शहरातून आले होते  आई बाबा सोबत . शहरात थोडे जास्त पैसे मिळतील आणि आम्हाला शिक्षण चांगले मिळेल या हेतूनी  . या शहरात नवीन होते , किती हि हुशार असले तरी सुरवातीला जर बुजालेच मी . तुझ्या काकांनी आर्थिक मदत केली आणि तुझ्या बाबांनी खूप सांभाळून घेतले मला . तुझ्या बाबांनी आत्मविश्वास दिला मला या शहरात वावरायला . अर्थात त्या वेळा आजच्या इतके मोठे , वाढलेले आणि कॉस्मो नव्हते हे शहर . तुझ्या आजी नि तर माझा कायापालटच केला . एकाच वाक्य म्हणाल्या त्या , शहरे आणि आजूबाजूची माणसे बदलत राहतात , आपण हि काळा प्रमाणे बदलायचे , पण आपली नैतिक तत्वे सांभाळून . आणि ज्याच्या कडे ज्ञान , प्रामाणिक पणा आणि माणूस जोडायची कला आहे ना  , तो पृथ्वीच्या पाठीवत कुठे हि राहू शकतो , सुखात . माझ्या आयुष्यात हे लोक आले नसते तर माझे आयुष्य नक्की वेगळे असते , कदाचित लौकिक अर्थाने सुखी असते , पण इतकी समृद्ध असते कि नाही कुणास ठावूक . आयुष्यात काही वेळा चुकली असेन मी सुद्धा , शेवटी माणूसच आहे . पण जगताना  खूप म्हत्वाचे निर्णय घेण्यामध्ये  खूप मदत केली मला तुझ्या आजीने , बाबांनी आणि काकांनी . आज तुझा काका , अवि हवा होता , त्याला खूप आनंद झाला असता , तुम्हा दोन्ही भावंडांचे एकमेकांवर असलेले प्रेम बघून . त्याचे आणि तुझ्या बाबाचे पण असाच होते अगदी . पण आता मला या शहरात राहायचा कंटाळा आलाय . कुठे तरी जवळ पास पण निवांत छोट्या गावात राहावे असे वाटतय ". 
"आई , अजून इतक्यात तरी अहि नाही ह . मला एकटे पडायला होईल ."
"इरा, अग एकटे असायला काय झालाय , निमिष आहे कि हक्काचा आता . त्याला कटकट कर आता :) आणि आकाश पण आलाय कि परत आता , बरोबर आहे न आकाश . आणि अग मी काय लगेच चाललीय का ."
आज आकाशाला आई वेगळीच वाटत होती थोडी .त्याला वाटत  पाच वर्षात शहर च काय पण आई पण थोडी बदलली आहे असे त्याला वाटत होते . स्वतः बद्दल , आपल्या घरंच्या बद्दल आई इतकी मोकळे पणानि कधीच बोलली नव्हति. आजी , काका , ती आणि बाबा यांचे जुने फोटो खूप वेळा पहिले होते आम्ही , कधी कधी तिच्या सोबत सुद्धा , ती पाहताना रमायची , पण बोलली कधीच नाही , कधी आठवणी सांगितल्या नाहीत . आई खरच  एकटी पडलीये का कि विचार करून करून थकलीये ती . कि आपले जे काही बोलणे झाले तेव्हा पाच वर्षापूर्वी, त्यमुळे थोडी बदलली आहे  . कदाचित आज मी तिला थोडे समजून घेवू शकतो , कदाचित काही इ साठी माफ हि करू शकतो . तेव्हा मी पण पंचविशीत च होतो कि . काही का असेना पण आता मी थोडे समजून घायला च हवे . आणि मी आणि ती दूर झालो तरी , इरा त्यांना दुरावली हेच विशेष . मला हि तेच तर हवे होते . आता तर मला उलट , त्या दोघी एकमेकांच्या जास्त जवळ आल्या आहेत असा वाटतय . Two is a company and three is crowd and may be that third person was me . आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली कि आई नि त्याला परत येण्या साठी सुचवले आहे बोलता बोलता . खरच मी यावर काहीच विचार नाही केला आहे अजून . 
"दादू , तू कसा रे असाच आहेस , निम्म्या वेळा हरवलेला स्वत मधेच . लक्ष दे न आमच्या कडे . तू मला काय घेवून  ते बोल . डॉलर  मधले बजेट आहे न "
"घे ग तुला काय हवे ते , मी कधी नाही म्हणालोय का . पण मला असे सांगता नाही येणार  काय ते . असे कर आई बाबांनी एखादा हट्ट पुरवला नसेल तर तो माझ्या कडून वसूल कर , म्हणजे सगळेच खुश "
"डन , मग माझे ठरलच आहे "
"हे बरे आहे , तुम्हा बहिण भावांचे  काय हो काकू . म्हणजे लग्न नंतर मी पण एखादा हट्ट  नाही पुरवला तर चालेल नाही का , तिचा भाऊ  आहेच कि , म्हणजे तेव्हा पण सगळेच  खुश "
" असे नाही हा, चालायचे जावई बापू . माझ्या बहिणीची तक्रार येवून उप्गोग नाही "
एकंदरीत  सगळे हसत खेळत पार पडत होते . निमिष चे आई बाबा पण आले होते . खूप बरे वाटले 
त्यांना पण . ह्या सगळ्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे होताना पहिले होते  आणि आकाश आणि इराचे विशेष  कौतुक होते त्यांना , तसे ते निमिष ला म्हणाले सुद्धा . आमच्या माघारी , आता निमिष ची काळजी नाही , तू आणि इरा आता मित्रच नाही तर नात्यांनी पण जोडले गेले ,खर तर निमिष लाही त्याची भावंडे आहेत , पण त्यांचे नाते तुमच्या सारखे नक्कीच नाही . आमचीच मुले आहेत , म्हणजे वाईट कुणीच नाहीत , पण एकमेकासाठी इतका वेळ आणि त्याग करणे त्यांच्या स्वभावातच नाही . गरजेला धावून येतील हि , पण ते तर रक्ताच्या नात्याची ओढ म्हणून . 
अजून एक दिवस तर गेला , रात्र सुरु झाली कि आकाश च्या स्वताशीच गप्पा सुरु . उद्या येतो असे आपण म्हणालो आहे खर पण , … काय होईल , जमेल का आपल्याला . कधी कधी जास्त ओळखीच्या ठिकाणीच गुदमरायला होते कारण अपेक्षांचे ओझे पण तितकाच मोठे असते न . 
सकाळी आकाश ला जग, थोडी उशीरच आली . बाहेर च्या खोलीत हसण्याचे , गप्पाचे आवाज येत होते . बाबा इतक्या सकाळी कसे आले आहेत , आवाज नक्की त्यांचाच . आणि आता इथे कशाला भास होतील , आकाश बाहेर आला , निमिष आणि बाबा गप्पा मारत होते . गेल्या  वर्षात कधी तरी विडीओ chat वरच पहिले असेल . 
"शुभ प्रभात , साले बाबू , चहा घेणार का ?"- निमिष 
"शुभ प्रभात , चहा चालेल , पण आज मीच करतो आपल्या सगळ्यान साठी . बाबा तुम्ही इतक्या लवकर कसे ?, म्हणजे आई म्हणाली होती  तुम्ही याल , पण मला वाटले  दुपारी याल ", आकाश ला वाटले , काय बोलतोय हे  आपण , साधे तुम्ही कसे आहेत हे पण नाही विचारले , सुचत नाहीये म्हणून चहा करण्याचा बहाणा 
"अरे लवकर आलो मुद्दामून , आई ला म्हणाले , आकाश ला थोडे लवकर घेवून , तसाच कार्यलय मध्ये जावून येतो , आणि मग तसेच घरी जावू . आणि खायला पाठवलाय आई नि , आज तुम्हा दोघा सोबत नाश्ता . आकाश , थोडा वेगळा दिसायला लागला आहेस , म्हणजे थोडा खराब झाला आहेस . अर्थात तुला प्रत्यक्ष बघून फार वर्षे झाली . पण बरे झाले आलास आणि घरी येतो म्हणालास हे तर उत्तम . तिथे गरज आहे तुझी . शेवटी इरा म्हणाली तेच खरे "
"काय म्हणाली इरा ?, आणि तुम्ही खूप दिवसांनी पहातंय म्हणून खराब वाटतोय , पण असे काही नाहीये , सुरवातीला जर सेट होई पर्यंत गडबड होती , आता तसे निवांत आहे . पण हे इरा काय म्हणाली ?"
"काही नाही रे , तिनी मला प्रॉमिस  केले होते कि तु नक्की येशील आणि खरे केले तिने . खर तर आम्हीच  तू आलास त्या दिवशीच तुला घरी आणायला हवे होते . पण तू येशील कि नाहीस असे वाटले . मग इरा नि च सुचवले इथे राहायचे "
"अरे , मी काही नाही येणार घरी बाबा . उलट मला वाटले , कि इतके लोक घरात आणि त्यात मी इतक्या वर्षांनी आलो तर सगळ्यान अवघडल्या सारखे वाटेल . उलट बराच झाले कि , मला तुम्हाला , आई ला , इरा ला , निमिष  ला निवांत भेटता आले ."
"मला माहितीये बेटा , सगळे एकदा पूर्ववत नाही शकणार . आपल्याला वेळ द्यायला हवा . काही गोष्टी सहवासाने सुद्धा बदलतात . मी  वर्ष पूर्वीच खर तर , माझे मत व्यक्त करायला हवे होते . पण गोष्टी अश्या घडल्या कि मी काही ठाम भूमिका घ्यायच्या मनस्थित नव्हतो . तू आणि अनू एकमेकांना अनुरूप होता असे मला वाटत होते आणि इरा चे म्हणशील तर तिला आपल्या घरात तेच सगळे हक्क आणि अधिकार होते जे तुला पण होते . इराच्या बाबतीत मी पण जर हळवा  आहे , आणि जे घडत होते त्यातले तिला काहीच कळू नये म्हणून माझी धडपड सुरु होती . आणि म्हणूनच मला तुझा निर्णय पटला होता , पण मी ठाम पणे तुझ्या पाठी शी उभा नाही राहू शकलो . निर्णयाची जबाबदारी टाळता  यावी म्हणून अनेक महत्वाच्या क्षणी मौन होतो , आयुष्य भर , हेच चुकले माझे . अनु काही खलनायिका नव्हती , पण अशी महत्वाकांक्षा असलेली मनसे , कधी कधी टोकाला जातात आणि केवळ स्वतचा विचार करतात . आणि याचा मला अनुभव आहेच कि . जे  झाले ते योग्य झाले , चुकून जरी इराला जास्त काही कळले असते , तर ती पोर पार खचून गेली असती . तिच्या मूळेच  सारे घडले असे तिला वाटले असते . आणि खर सांगू , काही काही गोष्टी अश्या असतात कि ज्यांचे ओझे आपण आयुष्यभर बाळगतो . ती वेळ माझ्या मुलांवर  येवो . असू दे , मी काय बोलत बसलो हे "
"असे काही नाही रे   बाबा , उलट मला बर वाटले कि तू इतका मोकळा बोललास माझ्या सोबत . कदाचित इतका वेळ गेल्या मुले आपण सगळेच आपल्या आपल्या पद्धतीने विचार करत होतो , जे घडले त्याचा . काही गोष्टी घडतातच , बदलत नक्की नाही येत . पण जे होते ते चांगल्या साठीच . कदाचित मी दूर होतो म्हणून तुम्ही तिघे थोडे जास्त जवळ आलात , तुम्ही मुलीची आणि मुली तुमची जबाबदारी निभावली.  अजून थोडा वेळ गेला न कि सगळे छान होईल पहिल्या प्रमाणे किंवा त्या पेक्षा हि छान . कदाचित आपण सगळेच एकमेकांना  गृहीत धरत  जातो आणि गुंता वाढत जातो . "
"खरे आहे , आणि माझे पण जरा  काही गोष्टीत दुर्लक्ष झाले खरे . पण तू  मला त्याची जाणीव करून दिलीस . नाही तर , मी स्वताला आयुष्यात कधीच माफ करू शकलो नसतो , तुझ्या आजीला , आणि काकाला मी शब्द दिला होता कि त्यांच्या माघारी  मी हे घर दुभंगू देणार नाही . पण आकाश , मला असे वाटतय कि तू आता परत यायचा विचार कारावास आणि स्वताच्या पुढच्या आयुष्याचा पण . इरा नि तिचे एक पाऊल  पुढे टाकल आहे . म्हणजे तिची  जबाब दरी संपली असे वगैरे नाही . पण तरीही …किती वाजता निघू यात आपण  "
"आलोच , १०-१५ मिनिट लगेच . बाहेरची काम करून परत येवू , मला थोडे समान आवरावे लागेल , मग जावू , दुपारी आपल्या घरी. निमिष तू येतोस का आता आमच्या सोबत  "
"नको रे , आज आई बाबा येतात न , त्यांना आणायला जातोय मी  .  आम्ही इथे २-३ दिवस राहू , आणि मग नंतर कार्यक्रम आमच्या जुन्या घरीच आहेत . कदाचित , मी फक्त झोपायलाच येयीन आणि कुणी आले तर येयिल. इराकडे पण एक किल्ली आहेच इथली , जर कधी लागले तर वापरा तुम्ही पण "
आकाश आणि बाबा बाहेर पडले . आज आकाशाल खूप छान वाटत होते , आई -बाबा दोघे पण भेटले . मनाची घालमेल थोडी कमी झालीये आता . दुपारी आकाश , त्याच्या घरी आला . वास्तू शी पण आपले एक नाते असते , असख्न्या आठवणी असतात . आकाशाला आठवत होते कि ४ एक वर्षाचा असेल ,तो  आई बाबा त्याला सोडून एक वर्षे , काका राहत होता तिकडे जाणार होते , वैद्यकीय सेवा दुर्गम भागात पोचावी म्हणून . आजोबांची ती एक अट  होती . आजी सांगायची कि , आई बाबा ची जर टाळाटाळ  होतीये असे लक्षात आले आणि आजोबांनी सांगितले कि , मी आधी म्हणत होतो तेव्हा गेला नाही आणि आता , मुलगा लहान आहे , मग त्याची शाळा असेल हे आयुष्य बहर सुरूच राहील . दवाखाना आणि आकाश ला आम्ही सांभाळू वर्ष दीड वर्षे . तुम्ही जावून या. तशी आकाशाला आजी आजोबांची सवय होतीच आणि अधून मधून ते इकडे येणार किंवा आजी आजोबा तिकडे जाणार आकाश ला घेवून असे ठरले . काका पण खूप लाड करायचा आपले , आपण तिकडे जायचो तेव्हा . आकाश ला आठवले कि साधार १ वर्षे आणि ३ एक महिने झाले आणि आई बाबा आले . आणि त्यांच्या सोबत एक छोटी , गोड बाहुली सुद्धा आली . माझी इरा , मला किती आनंद झाला होता न तेव्हा . घरात पण खूप दिवसांनी सगळे खुश होते . कारण त्या आधी , आजी आजोबा मधेच खूप शांत शांत असायचे . नंतर मोठा झाल्या वर  कळले कि अवि काका हे जग सोडून गेला त्याचे हे दु:ख होते . किती लवकर जातो काळ , आणि  आता काही दिवसात इराचे लग्न आहे . 
आकाश घरात आला , घर सगळे तसाच होते , त्याची रूम पण . इरा ५ वर्ष पूर्वी दुसऱ्या  रूम मध्ये शिफ्ट झाली ती तिथेच राहिली , जणू तिने आपल्या साठी केलेला हा पहिला त्याग किंवा आपल्याला दिलेली भेट . 
"आई दादू आला ग "- इराच्या आवाजात कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता . तिने आल्या बरोबर त्याचा आणि सामानाचा ताबा घेतला . घर एकंदरीत नॉर्मल वातावरण होते . आकाश येणार याची कल्पना असल्यामुळे  असेल कदाचित . खूप दिवसांनी त्याला शांत झोप लागली , कसलीच स्वप्ने किंवा भास न होता . शेवटी आपले घर ते आपले घर  , असे वाटलाच त्याला 
लग्न घरातले दिवस भरभर जात होते , आकाश आल्यामुळे नूरच पालटला होता . सगळी सूत्रे त्याच्या कडे होती आणि आई बाबा थोडे निश्चिंत झाले . इराच्या एक हट्टामुळे हे घर परत एकत्र आले होते . इरा तिच्या मैत्रिणी सोबत बाहेर गेली होती , बाबा दवाखान्यात . बाकी सगळे पाहुणे इकडे तिकडे फिरायला गेले होते कारण आज तसा कोणताच कार्यक्रम नव्हता . आई आणि आकाश दोघेच होते 
"आकाश , तुला बरे वाटतय न रे इथे , म्हणजे राहायला ।"
"हो ग , आपल्या घर सारखे सुख नाही बघ जगात , माझे तर सगळे आयुष्याच या घरात गेलाय . मला छान वाटतय "
"एक विचारू "
"मी परत येण्या बद्दल , काय ठरवलंय असाच न "
"हो "
" आता काहीच ठरवले नाहीये , येयीन हि कदाचित . पण जे काम हातात घेतली ते पूर्ण करून किंवा त्याची पुढची सोय लावून यायला हवे न . आणि इकडे परत येवून …. तसा काही प्रोब्लेम नाहीये . माझे काही जुने सहकारी होते , तुला आठवतील बघ , सानिका , सुमित , कुमार वगैरे , त्यांनी स्वतचा युनिट  सुरु केलाय . मला पण बोलवत आहेत , रिसर्च च काम आहे , माझ्या आवडीचे "
"मग तू काय ठरवले आहेस "
"अजून काहीच नाही , पण विचार करेन इतकाच सांगतो "
"आकाश , जे झाले ते विसरून जा . सगळी कटुता , समज गैर समज मागे टाकले तरच आपण पुढे जावू शकतो "
"विसरेन कि नाही सांगता येत नाही , पण कटुता नक्कीच नाहीये ग आता . पण तुम्ही इराला काही नाही सांगितले आहे न , मागचे . "
"नाही बाळा , तिला हे कधीच कळणार नाही , आमच्या कडून तरी . खर तर तिला  माहितीये , अगदी निमिष आणि त्याचा आई बाबा ना  पण . "
"पण इरा ला नाही सांगायचे कुणीच "
लग्नाला फक्त ३ च दिवस राहिले होते आता , आणि आकशा अजून एखादा आठवडा च होता इथे . मनावरचे ओझे खूप कमी झाले होते , सगळ्यांच्याच . जे काही घडते ते नियातीमुळेच .
भविष्य काळात काय होते हे आपल्याला काळात नाही आणि भूतकाळ आपण डावलू शकत नाही हेच खरे , आणि वर्तमानात काळात , भविष्याची हुरहूर आणि भूतकाळाची सावली असतेच कि सोबत 
अनु आली आपल्या आयुष्यात , पण बराच काही शिकवून गेली . तिच्या मुळे खूप गोष्टींचा उलगडा झाला मला, माझ्याच मनात असलेल्या प्रश्नाचा . व्यसनी महाभारत लिहिले आहे असे कि आपल्या सगळ्यान मध्ये त्याच्या प्रत्येक पात्रातले काही तरी गुण दोष आढळतोच .  सगळेच कधी तरी अर्जुन असतात , कृष्ण मिळाला आपला , तर पेच सुटतो , मला तेव्हा मिळाला माझा कृष्ण आणि आता …. जर नाही मिळाला तर ……  असे आकाश ला वाटले . कदाचित आई , बाबा , तो सगळेच आपापला कृष्ण शोधत होते आणि इरा …. ती कदाचित या सगळ्यात नव्हतीच मुळी …। 
क्रमश :  




 





Monday 22 June 2015

एक गोष्ट त्यांची पण :भाग ६

एक गोष्ट त्यांची पण :भाग ६ 

आकाश ला येवून खरा तर एखादा दिवसच झाला होता , पण  त्याला मात्र आपण किती तरी दिवस इथेच आहोत असे वाटत होते , क्षण भर हि पिच्छा न सोडणारे  विचार आणि भूतकाळ . त्याला  वाटले कि आपण तिकडे दूर एकटे होते पण तरी मन इतके बेचैन नाही झाले कधी आणि आता आपल्या माणसांमध्ये  आलोय तर , पण असच असते बहुतेक. मी किती हि वरून दाखवले कि मी शांत आहे तरी खळबळ आहेच कि मनात . लहानपणी असे कधी सुद्धा वाटले नाही कि असे काही प्रश्न आपल्या समोर उभे , राहतील ज्यांची उत्तरे मिळून सुद्धा , न मिळाल्या सारखी , आणि नवे प्रश्नच उभे करणारी . सगळ छान चालले होते कि , सुखवस्तू कुटुंब , उत्तम शिक्षण , सुशिक्षित आई वडील आणि एक गोड बहिण , आणि काय हवे . आणि अनु शी लग्न ठरले तेव्हा पण , एक सुशिक्षित, हसमुख आणि घरच्यांना आपलीशी वाटणारी आयुष्याची  साथीदार , सारे काही अगदी "परफेक्ट". पण मला परफेक्ट असे कधीच काही नको होते  मला बस समाधानी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारे आयुष्य हवे होते . मला कधी वळणाचे, घाटाचे रस्ते ,मानवलेच नाहीत , मग आयुष्य तरी कसे मानवेल . त्याला वाटले आपण पाच वर्ष मध्ये एकदा जरी येवून गेलो असतो , तर मन मोकळे झाले असते . आकाश निरभ्र झाले असते . आत्ता ,म्हणजे असे आहे कि आभाळ भरून आलाय , आकाशाला काळ्या मेघांनी झाकून टाकलाय आणि पाऊस बरसावा असे वाटतय आणि तो तर तर काही मनावर घेत नाहीये . 
 मनानी थकलेला माणूस झोपेच्या आहारी जातो खरा ,  पण मन जगच राहते .  आकाशाला लवकर जग आली आणि आपले आवरून तो खाली आला , सकाळी एक छाकर मारून यावी असा त्याचा विचार होता . त्याला काय वाटले कुणास ठावूक पण त्याची पावले आपोआपच हॉस्पिटल  कडे वळली . त्याच्या लक्षात आले कि निमिष आणि इराचे घर हे हॉस्पिटल पासून जवळ आहे, आणि त्याच्या आणि आपल्या आई बाबांना  पण तसे काही दूर नाही . 
"आकाश "
आपल्याला कोण हक मारताय असे त्याला वाटले आणि त्याने वळून पहिले , अरे विनीता मावशी . 
"काय रे , आकाश , ओळख लागतीये का माझी ?"
"काय ग मावशी , तुला विसरून कसे चालेल मला , खाल्ल्या दही-वड्यांना आणि औषधान तरी जगले पाहिजे मला. पण एक सांगू , मी गेलो न तेव्हा जेवढी तरुण होतीस त्या पेक्षा आता वातातीयेस खरे  "
"कंठ फुटला म्हणायचं तुला, तू पाठवलेला ipod वापरते बघ मी . हे बघ रोज सकाळी फिरायला येताना छान उपयोग होतो मला . आणि काय रे माझी खेचतोस काय तरुण दिसते म्हणून . बर मला संग कसा आहेस तू ? आता असे कर माझ्या बरोबर घरीच चल, सकाळचा नाश्ता  आमच्या सोबत कर , काल  चुकला आहेस तू " 
"अग  पण , निमिष  आणि इरा माझी वाट बघतील आणि कदाचित आज आई पण भेटेल"
"म्हणजे , तू जून घरी गेलाच नाहीयेस ?"
"नाही आग निमिष पण एकटाच आहे , आणी लग्न घरात माझी विश्रांती पण नसती झाली न म्हणून "
"हं , लक्षात येतेय रे माझ्या "
"एक काम कर, तू त्यांना फोन करून माझ्या  घरीच  बोलव , नाही तर तू नष्ट कर आणी मग जा त्यांच्या सोबत बाहेर "
"बर , चल , मी कळवतो त्यांना . तसे मला तुझ्या सोबत पण खूप गप्पा मारायच्या आहेत "
आकाश मागच्या वेळी विनीता मावशी कडे आला होता तेव्हा आणू त्याच्या सोबत होती , मावशीने जेवायला बोलावले होते , खर तर तिने सगळ्यांना बोलावले होते , पण आई - बाबा नाही म्हणाले , म्हणजे त्यांना जमत न्हवते . मग इरा पण नाही म्हणाली , घरी आजी जवळ थांबते असे म्हणाली आणी नाही आली . विनीता मावशी खर तर आईची द्साहाकारीच न्हवे, तर खूप जवळची मैत्रीण . तिला एक मुलगी होती , पण ती लहानपणीच दगावली , त्यमुळे मावशीने अगदी  स्वतच्या मुलांसारखे प्रेम केले आपल्यावर . खर तर तिची मुलगी असती तरी तिनी आपल्यावर तितकाच प्रेम केले असते , तिचा स्वभाव च मायाळू . इरा वर तर विशेष जीव तिचा . मी गेलो तेव्हा म्हणाली होती 
"आकाश , जायचे तर जा तुला , पण वर्ष भारत परत ये . मला , इराला आणी तुझ्या आई बाबा न पण तू हवा आहेस . तुझे मन शांत झाले कि ये . आणी फक्त इतकाच लक्षात ठेव कि माणूस परीस्तीही प्रमाणे वागतो ,  आणि  काही लोकांना थोडा जास्त स्वार्थ असतो , काही लोकांना कमी . पण म्हणून एकदम कुणालाच दोषी ठरवू नकोस . इराची काळजी मी आणी आई घेवूच . तू जा निवांत "
"ये रे आकाश "
आकाश भानावर आला 
"हे काय , काका कुठे आहेत "
"बाहेरगावी गेले आहेत , येतील २ दिवसात . मी गेले नाही , तुझी आई म्हणाली कि थांब , मला तेवढाच आधार "
"हो ते पण आहेच , तुझ्या इतके जवळच तिला कुणीच नाही "
"हो रे , पण  खर सांगू इरा खूप समंजस आहे . तिने तुझ्या आई ला खूप सावरलाय , आणी बाबांना पण आणि  हॉस्पिटल पण छान सांभाळते . कधी कधी तर तिचा कामाचा उरक आणी मन लावून काम करणे पहिले कि तुझ्या आजीची आणी काकाची आठवण येते मला . म्हणजे तुझे आई बाबा आणी मी असे एकत्र जितके करायचो न तितके हि एकटे करते जबाब दारिनी आणी सगळ्या सहकार्यांशी अगदी छान वागते . गर्व जसा नाहीच तिला . खर तर दुर्गम भागात जावून प काम करायचे होते तिला पण नाही जावू शकली , पण आमचे कॅम्पस घायचे काम तिने सुरु ठेवलाय आणी वाढवले पण आहे. पैसे  , प्रसिद्धी , यश या सगळ्याचे काही वाटत नाही तिला  "
"मावशी , हे मी का तुला सांगायला पाहिजे कि रक्तातच आहे तिच्या ते . खर सांगू मी गेल्या ५ वर्षात  तुम्हा सगळ्यांशी बोलत होते , पण इकडे खर काय घडले  होते काय माहित "
"सुरवातीला त्रास  झाला सगळ्यांनाच . तुझी आई तर , फारच अस्वस्थ होती . पण इरा , तिला नक्की काय झाले ते काळातच न्हवते न , कि तुझे आणि अनुचे असे काय बिनसले ते . तू तिला इतकाच सांगितलेस कि तुला परदेशी जायचं आणि तिला जायचे नाहीये , आणि त्या मुळे  होत आहेत . तिला सुरवातीला पटतच न्हवते , मग हळू हळू आम्ही तिला  समजावले  , तू पण तिच्याशी बोलतच होतास . मग हळू हळू ठीक झाले सगळे . "
"हो मला माहितीये , ती लागांसाठी पण तयार न्हवती . म्हणून निमिष नि पण तिला लवकर विचारले नाही , थांबला तो . म्हणून मग मीच बोललो तिच्याशी . खर सांगू का ,  मी जेव्हा गेलो तेव्हा फार काही ठरवले न्हवते स्वत बद्दल "
"मग , आता ठरवले कि नाही ? आई तुझी विचारेल कि नाही माहिती नाही , पण मीच विचारते तुला हक्काने . "
"लग्न बद्दल म्हणत असशील , तर खर  सांगू का . पाच वर्ष पूर्वी काहीच ठरवले न्हवते . म्हणजे एक अनुभव कटू आला म्हणून ते नातच नाकारणे नाही पटत मला . मी ज्या वातावरणात , देशात वाढलो तिथे असलेले लग्न संस्थेचे आणि आयुष्याच्या जोडीदाराचे असलेले नाते मला माहितीय आणि मान्य सुद्धा आहे . आपल्या सुख दुखाच्या वाटेवर साथ देणारे कुणी तरी हवाच असते कि ग आपल्याला . मनमुराद एकटे जगायला पण एक पिंड लागतो आणि कदाचित माझा तो  नव्हता . पहिले एक वर्षे असाच गेले , सेट होण्यात . मग हळू हळू मी रमलो अग . मी लग्न मुद्दामून टाळले नाही , पण फारसे कुणी आयष्यात डोकावले नाही आणि कुणी आले हि नाही तसे कि लग्न करावे "
"खरे आहे , आपण नाती लादून नाही घेवू शकत स्वतावर . आणि तुझी तयारी दिसली नः म्हणून आई नि पण काही लक्ष नाही घातले तुझ्या "
"मावशी , पण आई नि कधी मोकळे पानांनी मला विचारले सुद्धा नाही . मी एक दोन वेळा सुरवातीला म्हणालो सुद्धा कि तुम्ही कुणीतरी इकडे येवून जा . पण तेव्हा ते माझ्या वर थोडे से चिडले होते . आई ला तर असे वाटत होती कि तिला आणि अनु ला जणूमी गुन्हेगार ठरवले आहे आणि हाच माझा अपराध आहे . मग त दरी वाढतच गेली , इच्छा नसताना पण . तरी इरा होती म्हणून एवढे तरी संबध राहिले नाही का "
"हो , पण इरा मुळेच हि दरी निर्माण झाली न आकाश ?"
"मावशी तू सुद्धा ?"
"नाही आकाश , मी सुद्धा असे म्हणू नकोस . जसा तू तशीच ती , माझ्या कडेच कधीच भेद भाव नव्हता . पण तुला असे नाही का वाटत कि थोडा पजेसिव आणि थोडा हळवा आहेस इरा बद्दल . म्हणजे अनु आणि तुझ्या आई च्या काही काही गोष्टी न पत्न्या सारख्या होत्या . खर तर अनु ला इराची वाटणी नको होती ,  पण सुरवातीला असे नव्हते . तुझ्या आई सोबत सगळ्या  गप्पा गोष्टी, बोलणी झाल्यावर तिच्या पण हे लक्षात आले कि , तुझ्या आई ला ती सहज तयार करू शकते , या गोष्टी साठी . म्हणजे ते घर इराचे राहिलाच असते , तिला प्रेम हि मिळाले असते . पण खास करून हॉस्पिटल मध्ये अनु ला , तिच्या वरचढ कुणी नको होते आणि इरा निष्णात  डॉक्टर होणार हे आरश्य इतके स्वच्छ होते  . तुझ्या आई ला हि असे वाटले कि आपल्या या  वारास्याची हक्कदार अनुच , खर तर तू , पण तू नाकारालास म्हणून तुझी बायको . इरा च्या बाबतीत तुझ्या आई बाबांनी सगळी कर्तव्ये पार पडलीच असती , पण कदाचित कुठे तरी हि मुलगी आहे , लगन झाले कि काय माहित कुठे जाईल किंवा तिला दुर्गम भागात काम करायचे होते , तुमचा तो वारसा इरा नि चालवावा असे आई ला वाटत असेल कदाचित "
"तिला असे वाटत होते कि तिची तीव्र इच्छा होती तशी ?"
"आकाश , तुझ्या आई बद्दल तू असा विचार कसा करू शकतोस , इराची पण आई आहेच कि ती . पण मुला बद्दल कदाचित थोडी जास्त माया , किंवा मोह वाटत असेल तिला . मुलगा आपल्या जवळ राहावा म्हणून सुने ला असे अडकवून ठेवायचे होते तिला इतकाच "
"तुला पण असे वाटतय का ग कि माझे जर अतीच झाले . आणि तू म्हणालीस न कि मी हळवा आहे , आहेच मी पण तुअम्च्य सगळ्यांच्या बाबतीत आहे न , खर संग मावशी कळायला लागल्या पासून , कधी तरी तुला मुल नाही याची हौस मौज मारू दिली का ग मी , मग तुझ्या बाबतीत मी हळवा झालो तर चालते कि तुला आणि आई ला . मग इरा तर बहिण आहे माझी . आणि मी possessive नाही तिच्या बद्दल पण protective नक्कीच आहे बद्दल .  आणि अग सगळ्या  गोष्टी  मागे काही करणे असतात , परिस्थिती असते . आई बाबा तसे कायम व्यस्त  होते , आजी कर्तृत्वान खरी , पण आम्हा मुला साठी तिनी वेळ दिला . आई ला हॉस्पिटल मधेच काम करायला आवडायचे , पण बाबा आणि आजी साठी तिला कॅम्पस आणि बाकी सामाजिक कार्यात भाग घायला लागायचा .  इरा कुटुंबात आली आणि मला खूप आनंद झाला , इवलीशी छोटी शी इरा , तिच्या सोबत माझा वेळ मस्त जायचा . मला मित्र होते , पण तरी  घरातला एकटेपणा मात्र इराणीच दूर केला . आणि मला  हळू हळू आवडायला लागले तिची बारीक सारीक जबाबदारी   घायला .  शाळेत सुधा मी तिच्या बालवाडीच्या वर्गात हळूच डोकावून यायचो आणि तिला सुद्धा प्रत्येक बाबतीत मी हवाच असायचो . आणि मग वयाच्या एका अश्या टप्प्यावर , जेव्हा मी धड मोठा पण नव्हतो आणि छोटा पण , अश्या काही गोष्टी घडल्या कि मला इरा बद्दल जास्तच काळजी आणि जबाब दरी वाटायला लागली मला, काही काही माणसांशी आपले ऋणानुबंध  परमेश्वरानी च जोडून दिलेले असतात. सगळ्याच भाव बहिणीचे नाते आमच्या सारखे असतील असे नाही , पण म्हणून आमचे नाते नाकारता कसे येयील . माझी फक्त इतकीच अपेक्षा होती कि इरा कोणत्याच बाबतीत डावलली जावू नये . माझ्या जोडीदाराने , माझ्या गुण दोष सकट आणि माझ्या बहिणी सह माझा स्वीकार करावा . समजा इराचे आई वडील हयात नसते तर ,  हीच जबाबदारी घेतली नसती का ग ?"
"पटतय मला आकाश . कदाचित पाच वर्षापूर्वी जे घडले ते चांगल्या साठीच असेल . आणि तेव्हा तुझे पण वय काय फार मोठे नव्हते . आम्ही मोठ्या लोकांनी जर समजून घायला हवे होते . तुला २ वर्षात परत आणायला  हवे होते आणि इरा ला पण या आधी लग्ना  बद्दल विचारायाले हवे होते . नात्यामध्ये दुरावा येत राहतो कारण सगळेच आपल्या भूमिकेव ठाम राहतात . पण खर सांगू आकाश तुला , आम्हा मोठ्या माणसाना , पालकांना तुम्ही मुलांनी पण माफ करायला शिकले पाहिजे . आम्ही पण माणूसच आहोत . आम्हाला पण चुका करण्याची मुभा आहेच कि . आणि आमच्या पिढीला , हि जी तूंची स्पेस नावाची  concept आहे न , ती वयाच्या चाळीशी नंतर मिळाली आहे रे , त्या मुळे सुद्धा कदाचित आमचे असे झाले असेल  कि आमच्या सुप्त इच्छा , महत्वाकांक्षा , त्या वयात उफाळून आल्या . ज्या गोष्टी तरुण असताना आम्ही नाकारू शकलो नाही त्याचा उदेर्क असेल बहुधा .  आई बाबांना  एक संधी दे आणि जर कधी चुकले असतील तर समजून घे . इराचा जसा पालक आहेस न , तसाच त्यांचा हो . त्यांना त्याची गरज आहे आणि खर सांगू इरा हि जबादारी घेतीय , तिला काही अंशी मुक्त कर "
"मावशी ।"
"हो आकाश , ऐक माझे , आमंत्रणाची वाट नको बघू .  घरी जा . आणि किती पण अवघड वाटले तरी तसाच जा आणि राहा , पाच वर्ष पूर्वी सारखा . समज काही घडलेच नाही . तू नॉर्मल  वागलास न कि सगळेच तसेच वागतील  आणि पाहुणे आणि समज्ची तमा तू कधी पासून बाळगायला लागलास . लग्न मोडताना सुद्धा तू  पर्वा केली नाही मग आत का? आणि इरा साठी सुद्धा जा "
"तू म्हणतीयेस ते पटतंय मला ., मी निमिष सोबत बोलतो , त्याचे आई बाबा पण यायचे आहेत राहायला आणि बरे झालो बोललो आपण , मला आता खूप मोकळे वाटतय . म्हणजे आई  भेटेल न आता त्याचा ताण खूप कमी झालाय बघ आणि नाश्ता  पण मस्त झालाय "
" हो रे , मला पण बरे वाटले बघ तू आलास .आणि एक विचार कर , जर कुणी चांगली मुलगी , मैत्रीण असेल आणि आवडत असेल तर नक्की विचार कर . म्हणजे लग्न सर्व काही आणि आयुष्य तेच असे मी मनात नाही . पण शक्य असेल आणि मना सारखे  जोडीदार मिळाला तर हे नाते पण स्वीकार , त्यात हि मझा   आहे यार "
"मावशी , तुझे शेवटचे वाक्य सांगून गेले हा कि तू अलीकडेच परत तुज आहे तुज्पाशीचे पारायण केलेस "
" आता कसे , माझा मुलगा वाटतोस , बरोब्बर ओळखलस तू :)"
"चल मी पाळतो आता "
आकाश  मावशीच्या घरातून निघाला , असे वाटले कि भरलेले आभाळा मोकळे झालाय , आकाश निरभ्र झालाय आणि सर पडून घेल्याने मृदगंध दरवळतोय . मनाची ती प्रसन्नत घेवून आकाशनि पुढचे  पाऊल टाकायचे ठरवले 
बेल वाजली , दार उघडले , आई नि … आई आणि निमिषाच्या घरात . आश्चर्याचा धक्काच होता , म्हणजे आई भेटली कि काय बोलायचे हे तो ठरवत होता आणि अनपेक्षित  पणे तीच समोर . 
"दादू , काय रे झाले का लाड करून घेवून . मावशीनी खूप कौतुकानी खायला खटले असेल "
"हो ग ", असे म्हणून आकाश आई कडे वळला , मावशीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते 
"आई , चहा करतेस . चहा पिवून , मी आवरतो मग लगेच बाहेर पडू "
"हो करते"- आई इतकाच बोलली 
"आई , मला पण आणि आले आणि पात घालून कर "
"पाहिलेस आकाश , तुझी बहिण आता मला चहा कसा करायचे ते सांगतीये आणि ते पण का , तुझ्या साठी , तुला हवे तसा . मला आहे ठावूक ताई  साहेब "- आई 
"काय ग आई "
"बर , इरा , निमिष आणि आई तुम्ही तिघे इथे आहात तर मला काही तरी सांगायचे आहे तुम्हाला "
"काय ?"- इरा , निमिष आणि आई तिघे हि जर कालाजीनेच म्हणाले 
बाप रे आता काय सांगेल आहे , मी इथे आले म्हणून हा परत तर जाणार नाही न निघून , पण आपण हून बोलला आणि इरा साठी आलाय तर …आईच्या मनात भरभर प्रश्न येत गेले . 
दादू आईशी बोलेल आपणहून असे वाटले नव्हते , पण नोर्म वाटला मग वाढला पूर्वीची शांतता होती का ती ? असे इराला वाटले 
आणि निमिष त्याला खर तर काही सुचतच नव्हते 
आकाश नि पुढे बोलणे सुरु केले 
"अरे मी काय न्यायाधीश आहे आणि शिक्षा सुन्वणार आहे का , असे चेहरे बनवायला . निमिष पण सॉरी मित्रा "
"का रे ?"
" अरे काही नाही , मी उद्या सकाळी जायचे म्हणतोय "
"कुठे , अजून लग्नाला चांगले ८-१० दिवस आहेत कि आकाश आणि त्या साठी आलास न तू ?"- आई 
"दादू ?"
"अरे पूर्ण ऐका तरी , आई मी उद्या सकाळी आवरून येतोत आपल्या घरी . दुपारी जेवयालो येतोय मी . मी तिकडे असेन तर मला जास्त मदत करता येयील आणि इराची पण धावपळ कमी होईल . आणि निमिश्चे आई बाबा उद्या संध्यकाळ पर्यंत येत आहेत , म्हणजे त्याला पण कंपनी आहे आता . "
"आता काय बोलू मी , राहा म्हणालो तर , काकू कम सासूबाई चिडणार आणि होणारी बायको सुद्धा . आणि जा म्हणालो तर मित्र म्हणेल गरज सरो मित्र मरो "
"मला ठावूक आहे निमिष कि तुला जर त्रास होईल मी इथे न राहल्याने . म्हणजे इरा मला भेटायच्या निम्मित्ताने जास्त येवू शकणार नाही न "
"नको , तसे पण अति तिथे मत , लागणं आधीच भांडण नको , तू आपला तिकडेच राहा "- निमिष 
"ठरले तर मग ,  आई उद्या प्लीज गाडी पाठव समान खूप आहे "
"हो पाठवेन , हवे असेल तर बाबा पण येतील "
इरा खुशीत होती , तिला आपल्या भावाचे खूप कौतुक वाटले . किती छान सांभाळून घेतले त्याने , आता आई पण ख्सू आहे .  दाखवणार नाही ती , स्वभावाच नाही तीच . मी हट्टाला पेटले म्हणून इथे तरी आली .
"चला , मुलानो पटपट बाहेर पडू यात , निमिष तुझ्या आई बाबा न पण डायरेक्ट दुकानातच बोलाव . उरकून टाकू खरेदी . आणि निमिष तू आणि तुझा मित्र दोघांनी आज आटपा काय ते  "
संथ पाणी वाहते झाले  होते , अर्थात आरश्य इतके स्वछ नक्कीच नाही  . आई आकाश च्या निर्णय बद्दल काहीच बोलली नाही . आकशाला खरेदी करायला सुचवून , एक प्रकारे त्याच्या येनचे स्वागत केलेच होते तिने , पण घरी येण्या बद्दल ती मौनच होती . पण येवू नको असे हि नाही म्हणाली . 
इरा खुशीत होती , आई गप्प होती , निमिष थोडा confuse होता कि आकाशाला जमेल का तिथे राहायला , आणि आकाश , सगळ्या भावना मिसळून गेल्या होत्या , घरची ओढ , इरा  सोबत त्या घरात राहण्यातली गम्मत , आई बाबा कसे स्वीकारतील आपले येणे,  याचा थोडा तणाव , पण  तरी त्याला छान वाटत होते . परीक्षे मध्ये पेपर चांगले  गेले कि कसे निवांत वाटते , पण निकालाची हुरहूर राहतच न ते काही तरी 
सगळे काही छान होईल , असे मनात ठेवूनच सगळे बाहेर पडले . पाच वर्षे म्हणजे एक पिढी नि काळ पुढे सरकला .  वाटेत हॉस्पिटल लागले , आई म्हणाली दोन मिनटात येते , मग इरा पण सोबत गेली . आकाश नि सहज पहिले  बाहेर तर , मोफत उपचार विभागाचे  नामकरण झाले होते , इराणी आजी आणि काकाच्या नावाने हा विभाग , परत पुनर्जीवित केला होता . काकाची एक हलकीशी स्मृती त्याचे डोळे पाणावून गेली आणि आजीच्या मायेन डोळ्या  दाटून आले , इतके कि त्याला मिटून घ्यावे लागले . तो स्वताशी म्हणाला , इरा नि तुमची स्मृती अशी जपली आणि मी …मि तूंची स्मृती जपेन आयुष्यभर , माझ्या पद्धतीने 
क्रमश :

 Sheetal J 

Wednesday 17 June 2015

एक गोष्ट त्यांची पण :भाग पाच

एक  गोष्ट त्यांची पण :भाग पाच 

गाणे तर एकीकडे सुरु होते , कानावर पडता होते पण आत शिरत न्हवते , कारण आठवणीचा कल्लोळ उठला होता  , प्रवासामुळे असेल किंवा मानसिक थकव्या मुळे असेल , आकाशच डोळा लागला . आणि किती वेळ गेला काय माहित , इरा त्याला उठवत होती , अरे एकच दिवसात दुस्रान्द्या हे स्वप्न , भारतात आल्यामुळे या स्वप्नाची फ्रिक्वेन्सी वाढली काय ? , 
"अरे ए , उठ ना , आवर . माझाच चुकले तू ई निमिष अश्या दोन महान माणसांच्या जीवावर मी लग्न करायचा घात घातलाय . झोपला तुम्ही दोघे पण निवांत , उठ , झोपून झोपून बघ कसा ,मंद झाला आहेस "
"बाप रे , इरा खरच तू आलीयेस "
"म्हणजे आकाश , मी येणारच होते "
"आग तसे न्हवे, मला वाटले स्वप्न आहे "
'"स्वप्न?"
"अग  हो , पण जावू दे ती एक मोठी स्टोरी आहे , मी आवरतो पटकन . तुझ्या त्या हिरो ला आवरायला सांग " 
"त्याचा क्लास घेवूनच तुला उठवायला आलीये मी , आवारात आलाय त्याचे . मी चहा टाकते पटकन , मग आपण निघू "
आकाश नि पटपट आवरले , किती तरी दिवसांनी , वर्षांनी इराच्या हातचा चहा प्यायला मिळाला . एक आठवडा इरा आणि एक आठवडा आकाश अशी त्यांची दुपारच्या चहाची वाटणी होती , आणि किती तरी वर्ष तशीच होती . चहा , साखर , दुध , पाणी तेच , पण करणारा बदलला कि चहाचा स्वाद बदलतो , नात्यांचे पण तसाच काही , माणूस बदलला कि दृष्टीकोन बदलला , असे आकाश ला वाटून  गेले . 
"ऐका ना  मुलानो , पहिले मेनू  ठरवू ,  अर्धा तास लागेल फार तर आणि आई बाबांनी त्यांच्या सूचना दिल्या आहेत नेहमी प्रमाणे "
"म्हणजे ते येणार नाहीयेत इरा ? मला भेटले पण नाहीयेत आल्या पासून "
"एक तर तुला येवून अजून एक दिवस पण होतोच आहे दादू , आणि तिकडे जम गडबड आहे रे . त्यांना काय झेपतच नाहीये दोघांना . म्हणजे कामाला माणसे  आहेत तशी , पण इतके दिवस , किंवा वर्षे त्यांना काही पाहावे लागत न्हवते आणि तुझ्या साखर पुड्या पर्यंत आजी  होती , तसे त्यांना काही करावे लागत न्हवते . कसे असते न , माणूस असताना जी जाणीव होत नाही , ती जाणीव तो माणूस नसला कि प्रकर्षाने होते आणि त्या माणसाची उणीव कधीच भरून निघत नाही मग . माझाच बघ न , आजी गेली आणि नंतर तू तिकडे , खूप एकटे वाटायचे घरात . आई बाबा असतात पण तरी ….  असो कदाचित हि जाणीव त्यांना पण झालीये आणि म्हणून मला म्हणाले कि आता आकाश आला आहे तर आमची निम्मी काळजी कमी झाली "
"खरच सांगीति आहेस  इरा "
"म्हणजे काय आकाश , अरे त्यांचे खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तुला हि ते माहितीये , पण आईस ब्रेक करायला पाहिजे , ते भेटायला नाही आले , पण तू फोन पण नाही केलास . असू दे मेनू ठरवताना  कर म्हणजे बोलणे पण होईल "
इरा गाडी पार्किंग मधून बाहेर काढायला गेली , आकशा निमिष ला म्हनला 
"अरे आमची हि छोटी इरा किती मोठी झालीये रे , एकदम जबाबदार माणसा सारखी , म्हणजे समजूतदार तर ती होतिच पण आता जे बोलली न , एकदम मोठी झालीये असे वाटतंय "
"अरे म्हणून तर लग्न होतंय न तिचे माझ्याशी :), भारी सिलेक्शन  आहे माझे "
"कळले , चल "
इरा नि खरच फोन केला घरी , बाबा सोबत बोलली आणि आकाश कडे दिला फोन . तसे क्वचित कधी तरी त्याचा फोन होत असे आई बाबांशी , म्हणजे तोच करायचा , इराचा हट्ट  म्हणून . आकाश नि कामाचे बोलणे केले आणि विचारले कि बाकी तयारी कशी सुरु आहे लग्नाची 
बाबा इतकाच म्हणले "तूच बघ कि एखादे दिवशी घरी येवून "
आकाशला वाटले कि घरी ये म्हणाले , पण लगेच त्याला वाटले कि एखादे दिवशी असे म्हणाले :) , त्याचे च तर घर होते . कदाचित त्यांना घरी ये  म्हणायचे होते . आकाश ला जर बरे वाटले 
"आता काय इराबाई ?"
"आता , दागिने खरेदी , आणि उद्या थोडी कपडे खरेदी आहे , उद्या आई ई विनीत मावशी येणार आहे , निमिष आइनि काकुना आय मीन मझ्या सासू बाईना  पण बोलवले आहे आणि तुम्ही दोघे ठीक १०. ३० ला उद्या तयार राहा "ओ ग्रुप लीडर , उद्याचे उद्या , आजचे आवरू आता , ए यार आकाश , तुझी बहिण लेडी हिटलर आहे यार . "
"अरे मग आता cancel करू लग्न , करू का सांग "- आकाश 
" अरे , तुम्ही दोघे बहिण भाऊ म्हणजे न , एकाला झाकावे आणि दुसर्याला काढावे "
इरा , आकाश आणि निमिष खरेदीला बाहेर पडले 
"आकाश ची चोइस मस्त आहे . माझ्या साठी किती काय काय आणायचो तो . बाहेर गेला सेमिनार ला किंवा कोन्फ़रस ला कि माझ्या कडे नवीन वस्तू आलीच "
"बघ बाबा आकाश , हिला पटवायला मी इतके गिफ्ट्स दिले , पण कौतिक नाहीच आमच्या नशिबात "
"अरे , ह्याच्या गिफ्ट्स म्हणजे न , सगळ्या अतरंगी एकदम . म्हणजे मस्त असायच्या पण विअर्ड असायच्या "
आकाश ला खरच परत आठवले , कि आपल्याला इरा साठी काही तरी घ्यायला नेहमीच किती आवडायचे . अगदी लहान पणी तिला काळात न्हवते तेव्हा तिचे फ्रोक सुद्धा माझ्याच आवडीचे असायचे . आई इरा ला हे घे न अशी सारखी भुणभुण असायची आईच्या मागे आणि आई म्हणायची अरे स्वतासाठी पण हट्ट  कर कि कधी तरी [?]
खरेदी संपवून , जेवण करून निमिष आणि आकाश घरी आले आणि इरा तिच्या घरी परताली 
आकाश  हातात पुस्तक घेवून झोपायच्या तयारीत होता , पण मनात आठवणीचे पुस्तक उघडले होते न . त्याला आठवले कि त्याने एकदा इरा साठी हिऱ्याचे कानातले घेतले होते , त्याच्या सुरवातीच्या कमाई  तून , इरा ला तशी या सगळ्याची आवड कमीच , आपलीच हौस  जास्त . पण आपण आणले असले कि इरा आवर्जून वापरायची . आकाशाला पुन्हा जुना संवाद आठवला ,दुपारी अर्धी राहिलेली आठवण , जणू मध्यंतर संपल्या प्रमाणे पुन्हा सुरु झाली पुढच्या भागात 
"आकाश , तू नाराज नको होवू . मी बोलेन या विषयावर बाबांशी पण आणि आजी सोबत पण आणि मग आपण ठरवू कि अनु ला किती जबाबदारी द्यायची वगैरे . खर तर मुले आई सोबत बायकोच्या हकाक्साठी भांडतात आणि आम्ही देतोय  आपणहून तर तू "
"आई , तू हे काय नवीन काढले आहेस हक्क वगैरे . आपल्या घरात हि भाषा कधीच न्हवती . जे काही आहे ते आपले सगळ्यांचे आहे न . नशिबानी आणि कर्तृत्वानी या घरात पैसा कधीच कमी न्हवता  आणि आपण कुणीच  कोत्या मानाने वागलो नाही आहोत. तूच लहान पणी, आम्हाला कधी सुद्धा आमच्यात आणि घरात  किंवा हॉस्पिटल मध्ये काम करणरया लोकांच्या मुलांमध्ये   फरक करून दिला नाहीस , आणि आता काय हक्क वगैरे , आज हक्क म्ह्नाणाली आहेस उद्या दुसरे काही "
"आकाश , ताणू  नको . आणि ती पण  घरात येयील  मग तिचा काही हक्क असेल कि नाही या वर . "
" आहे न , मी कुठे नाही म्हणतोय , पण तिला तो हक्क मिळवू दे न . ती येवू तर दे , इतकाच माझे म्हणणे आहे . खूप आधी पासून हे असे मला नाही ठीक वाटत आहे . आपल्या घरात जे अहि आहे ते सगळ्यांचे , माझे , तुझे , बाबांचे आणि इराचे सुद्धा . आणि जे माझे हे ते तिचे आहेच कि . पण म्हणून जे इराचे आहे ते तरी तिला देवू नकोस  "
 "आकशा तुला काय म्हणायचे आहे ?"
"हे बघ , मला हे बोलायाचा होतच तुझ्या सोबत . मी इथे नसताना काही तरी बदललाय , म्हणजे माझ्या मागच्या भेटीत आणि आता . म्हणजे नक्की नाही माहित , पण काही तर बदल झाले आहेत असे मला वाटते "
"असे काही नाहीये , पण हो एक गोष्ट म्हणजे , आजी म्हणाली म्हणून मी आणि बाबाबी अनु ला आणि तिच्या घराच्यान , घरातली इतर बऱ्याच  गोष्टींची कल्पना दिली , . म्हणजे तसे आज्जी नि त्यांना सांगितले सगळे . आपली आर्थिक परिस्थिती असेल किंवा नातेवाईक आणि बाबाचे लहानपण , तुमचे लहानपण वगिरे , तिचे असे म्हणणे आहे कि मुलीच्या लोकांना सगळे माहित हवे आत्या तर तुझी बाहेरच आहे अमेरिकाला ती काय परत यायची नाही, तुझ्या लग्नाला च येते असे म्हणाली आहे तरी  आणि काका , त्यांना तर हे जग सोडूनच किती वर्षे झाली . त्यामुळे आता  तसे तुझे बाबा आणि तू "
 "आणि इरा आणि तू  "
"हो "
"मग काय म्हणाले , काही नाही , बरे झाले तुम्ही सांगितले असे म्हणाले . मुद्दाम अनु समोरच सांगितले सगळे "
"बरे झाले . पण माझा मुद्दा तो नाहीच आहे आई . "
"अरे काही बदलले नाहीये इकडे , तुझे काही तरीच "
"मग इराची खोली का बदलली आहे , ती पण काही बोलली नाही मला . म्हणजे मेल मध्ये किंवा फोन वर , तू पण काही बोलली नाहीस "
"ते तू इरालाच विचार न. तीच म्हणाली कि हि खोली मी आणि दादू  वापरायचो आणि हि तशी मोठी खोली आहे , तर मग मी दुसरी खोली वापरेन , हि आपण रिनोवेट करू दादू आणि अनु साठी अनु म्हणून ती  आत दुसऱ्या  खोलीत  राहतीये .  "
"पण  मला न विचारता का कारभार करता तुम्ही असले , आणि ती एक लहानच आहे , अक्कल कमी आहे तिला , पण आई तू तरी । कमीत कमी आकशाला विचारू असे म्हण्याचास कि "
"अरे पण इराच म्हणाली कि दादूला काय विचारायचं , माझे अनुशी बोलणे झाले आहे "
"अनु शी  बोलणे झाले पण , मला आज अनु काहीच नाही बोलली या बद्दल "
"अरे इतक्या दिवसांनी भेटलास , त्यामुळे बाकीच्या गप्पात राहून गेले असेल "
"तरीच ती , मला काही तरी  होम डेकॉर वगैरे सनग्त होती , पण हे नाही म्हणाली काही . का बरे ? न सांगण्या सारखे काय आहे ?"
"अरे असेल काही तरी तिचे आणि इराचे , कुणी सांगायचे ते , पण काय रे तू अनु साठी काही सुद्धा आणत नाहीस . काही तरी घेवून दे तिला . बरे वाटते मुलीना जर आणि आज काल तर तसा ट्रेंड पण हे "
"हे तू बोलतियेस आई ?"
"नाही , तुझ्या बहिणीचा  निरोप आहे तुला . मला म्हणाली आई तूच सांग . मी सांगितले तर त्याला परत वाटेल हि काय लहान आहे हिला कळतंय . "
"आग पण आई , मध्ये मध्ये मी आणत असतो कि काही तरी , दर वेळी काय . आणि नाही त्या सवयी नको आहेत मला . आणि तसा हि अनु ला काय कमी आहे . मी काही आणले कि हिचे गेस सुरु होतात , कुठून घेतले , किती ग्रैम चे आहे , कोणता ब्रान्ड , किती किंमत आणि …. आग अनु खूप ऐशो आरामात वाढली आहे , तिला गिफ्ट दिले तरी काही अप्रूप किंवा कौतुक नाहीये त्याचे , मग मला नाही आवडत "
"अरे असतो एखाद्याचा स्वभाव . आणि आपल्या घरात नेहमीच वेगळे वातावरण होते , पैसे असले तरी म्हणून तुम्हा मुलांना हे जरा नवीन आहे . पण बाकी ती चांगली आहे "
"हो ग , म्हणून तर मी लग्नाला हो म्हणालो न .  आणि खर आहे एखादी गोष्ट  सोडायला हवी , बाकी दहा चांगल्या असतील तर . मी घेईन उद्या तिच्या साठी काही तरी . पण खर सांगू इराणी आणि तिने हे रूम चे मला सांगायला हवे होते आणि तू प्लीज परत ते हक्क बिक्क नको बोलू , मला कसातरीच वाटते "
"ओके बेटा  आणि तू झोप आता , उशीर झालाय "
आकाश नि ठरवले कि उद्या अनु ला आणि इरा ला या बद्दल विचारायचे . सकाळी उठला , इरा मात्र तो उठायच्या आधोच निघून गेल होती , खर तर नेहमी पेक्षा ती लवकर का गेली हे त्याला कळले न्हवते  आणि आज तर सुट्टी आहे हिला आज काय काम निघाले इतके , पण कुणाला विचारणार , सगळेच बाहेर गेलेले दिसतात . 
तेवढ्यात फोन वाजला 
"हेल्लो आकाश "
"हा बोल निमिष "
"अरे इरा चा निरोप आहे तुला कि ती  उद्या सकाळीच परत येयील , तिचे काही तरी काम आहे म्हणून मैत्रिणी सोबत बाहेर  गेलीये ,  तिने आई ला फोन करून सांगितले , तू झोपला होतास म्हणून तुला नाही उठवले म्हणाली "
"ओं तुला कसे कळले , अरे मला वाटेत भेटली , योगायोगाने . मग म्हणाली मित्राला निरोप सांग . आणि म्हणाली कबाब मे हड्डी  होवू नकोस . चल ठेवतो आता. जमले तर दुपारी चक्कर टाकतो "
"बर , पण ये शक्यतो . तुझ्या शी थोडे बोलायचे आहे "
"बरे , बाय "
आकशला काही काळात न्हवते कि इरा कुठे गेली आणि जवळ पास कुठे गेली असेल तर मी पण गेलो असतो कि . आणि उद्या एकाच दिवस आहे मी  हे माहित असून सुद्धा गेली . आणि काळ तर म्हणाली मला कि उद्याचा पूर्ण दिवस तुझ्या सोबत . परत फोन वाजला 
"हेलो , अनु बोलतिय " 
 "बोल ग "
"अरे , तुझे आवरले कि इकडेच ये न , मला पण आई नि आज ऑफ दिलाय हॉस्पिटल मधून . जर बाहेर जावून येवू , माझी किरकोळ कामे पण आहेत आणि आपल्याला पूर्ण दिवस मिळेल एकत्र "
" येतो मी . पण आई , अनु आणि आता तू पण कुणीच काही सनग्त नाहीये मला . तुमचे तुम्ही काय ठरवताय काय माहित "
"अरे , माझा आणि इराचा प्लान होता आजच , तुला सरप्राईज करायचे . पण ती शहाणी स्वतच गायब आहे आता "
"म्हणजे , तुला पण माहित आहे कि ती घरी नाहीये ते ."
"हो , अरे मगाशी आईना फोन केला न तेव्ह्या त्या म्हणल्या कि इरा सकाळीच बाहेर गेलीय आणि उशीर झाला तर उद्याच येयील बहुधा . मग तू येतोस न "  
"हो येतो , तासाभरात , "
आकाश ला इराचे हे नसणे च सरप्राईज होते , पण त्याला वाटले कि आता मोठी झालीये ती , स्वताचे पण आयुष्य आहेच कि तिला आणि तेवढी स्पेस तर द्यायली हवी तिला पण . 
"वाह , अनु छान दिसत आहेस कि एकदम आज."
"म्हणजे , तुला खरच सौंदर्य दृष्टी आहे म्हणायची ."
"अरे म्हणजे काय , इराला विचार , माझी आवड चांगली आहे म्हणून तर तिचे सगळी खरेदी माझ्या सोबत असते , कपड्या पासून अगदी कानातल्या पर्यंत . ए तुझे पण इर्रिंग  छान आहेत, हिऱ्या चे आहेत का ग ?  पण मुंबईला डिझाईन जास्त पाहायला मिळतात . मला आठवते इराला पण मी असेच आणले होते एकदा हिऱ्या चे , तिला खूप आवडतात ते  "
" हो , म्हणाली मला ती एकदा . आज बघ कसे डिच करून गेली आपल्याला "
"असुये दे ग. तुझी काय ती काम आटोपली कि आपण जरा खरेदी करू ,तुझ्यासाठी . काय घायचे ते ठराव "
" वाह , आज काय एकदम मस्त मूड दिसतोय "
"हो आहे खरा"
गाडी चालवताना सहज विषय काढून आकाश नि   अनुला  विचारलाच रूम बद्दल . 
"काय मग , अनु , काय काय प्लानिंग रूम सजावटी बद्दल , इरा नि रूम खाली केलीये . खर तर तिचा फार जीव आहे त्या रूम वर , म्हणजे तिची घरातली फेवेरेट  जागा आहे ती "
" हो अरे , म्हणजे ती काही बोलली का तुला ?"
"कशा बद्दल ?"
"अरे हेच रूम बद्द्ल "
"नाही,  का ग ?"
"अरे काही नाही , म्हणजे तसे सांगण्या सारखे किंवा न सांगण्या सारखे काहीच नाहीये . काय झाले कि मध्ये मी आपल्या घरी आले होते न , तेव्हा मी आणि अनु गप्पा मारत होतो , तर सहज बोलणे झाले . आजी म्हणत होत्या कि आई बाबा ची रूम आपण घेवू आणि आई बाबा दुसरऱ्या  बेडरूम मध्ये शिफ्ट होतील. मी म्हणाले कि मला वाटले कि हीच रूम आमची असेल , म्हणजे तुझी रूम तीच आपली नाही का . कारण तशी ती रूम मोठी आहे आणि छान view  पण आहे . मग इरा च म्हणाली कि आवडली असेल हि रूम तर तुम्ही घ्या हि आणि ती शिफ्ट होईल दुसऱ्या  रूम मध्ये . तसे पण तुमचे घर इतके मोठे आहे कि , बाकीच्या खोल्या बंदच  असतात. मग इरा म्हणाली कि जर चेंज  करावे लागेल इंटिरियर , तर मग मी लगेच रूम रिकामी करते , काम सुरु करता येयील . अरे कसली उत्साही आहे ती , लगेच आई बाबा शी बोलून , माझ्या सोबत आली पण  डेकोरेटर कडे आणि काम पण सुरु केले . मला म्हणाली दादू ला सांगू नको "
"हं "
"अरे मला वाटले . इरा बोलली असेल तुला "
"नाही तिचे काही बोलणे नाही झाले माझ्याशी तसे, कारण काळ मी तुला भेटायला आलो आणि सकाळपासून हीच गायब आहे . तसे मी विचारले तिला कि रुम का शिफ्ट केलीस तर मला म्हणाली गम्मत आहे नंतर सांगते . ती काय पण म्हणेल ग , कि तुम्ही हि रूम घ्या वगैरे , तुम्ही कशाला ऐकता  ग तिचे  "
"अरे पण आकाश , ती आपण हून म्हणाली आणि मला पण आवडली होती ती रूम आणि आई पण म्हणाल्या कि खोल्या जास्त आणि माणसे कमी , इरा ला जिथे हवे तिथे ती राहू शकते आणि तसाही २-३ वर्षांचा तर प्रश्न आहे . इरा कदाचित पीजी करायला बाहेर पण जाईल  आणि इथे असली तरी तसे काय बिघडत नाही , इतके मोठे घर आहे . आणि आज न उद्या ती पण लग्न होवून जाईलच कि "
"बाप रे , केवढा पुढचा विचार आणि काय ग सारखे इराच्या लग्नाचे किंवा बाहेर जायचे हे काय काढलाय तुम्ही "
"तुम्ही म्हणजे ?"
"तू आणि आई नि . ती पण असाच काही तारो म्हणत होती "
अरे म्हणजे काय  इरा काय अशीच आयुष्यभर सोबत राहणार आहे काय आपल्या ?मोठी झालीयए ती आता , " 
"अरे पण इतकी पण मोठी नाहीये ती . आणि जर तिला लगनच करायचे नसेल किंवा साम्ह्जा तिच्या होणाऱ्या  जोडीदार कडे त्याचे घर नसेल , तर ते आपल्या घरात राहू शकतात , मला तर आवडेल बाबा . मी असाच मुलगा शोधतो . आणि जर तर डॉक्टर  असेल तर प्रश्नच नाही , हॉस्पिटल ला पण मदतच होईल न "
"काही पण आकाश , असे कसे होईल . म्हणजे असे नसते कधी ."
"का असे झाले तर काय हरकत आहे . बरे घराचे राहू दे , पण डॉक्टर  असेल तर बरे होईल न , म्हणजे आई बाबांना  काळजी नकोच . तू , इरा आणि तो , म्हणजे आमची परंपरा सुरु राहील "
"हं , तशी आता आईना काळजी नाहीये , मी जोइन झाल्या पासून "
"ते आहे , पण तू पण नवी आहेस न अजून आणि आई बाबा तसे फिट  आहेत , काम करायला . खर तर मी डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा  होती , पण माझी इच्छा  पण ऐकली त्यांनी . आणि इरा आहेच कि त्यांचे स्वप्न पूर्ण करायला . ती rank होल्डर  आहे, आणि हुशार, समंजस , आणि संवाद कौशल्य , चांगली डॉक्टर होईल ती "
" नक्कीच . पण आज काल  खूप struggle  आहे अरे . आपला सेट अप  जुना आहे आणि आई बाबा नि खूप नाव करून ठेवलाय , म्हणून खूप शिकायला मिळतंय "
 "अग , आई बाबा तरी खूप नंतर . खर तर आजी सांगते कि आजोबा आणि तिने जेव्हा दवाखाना सुरु केला न तेव्हा सुरवातीला खूप त्रास झाला . त्या काळी पण आजी डॉक्टर होती , आणि नंतर माझा काका . तसा लवकर गेला तो पण मला थोडा थोडा आठवतोय . बाबा ला तर डॉक्टर व्यायचे नव्हते, पण काका त्याचा रोल  मोडेल म्हणून तो झाला . आणि आई तर खरे , हुशार पण तिची परिस्थिती पण न्हवती . आमच्या हॉस्पिटले मध्ये तिचा भाऊ होता  admin ला . काकाचा मित्र तो . काकाला कळले कि आई खूप हुशार आहे आणि तिला डॉक्टर व्यायचे आहे . त्या;अ अगदी बहिणी सारखी ती म्हणून मग काका नि माझ्या आजी आजोबाना सांगितले आणि तिचा मेडिकल चा खर्च केला सगळा . आणि मग हॉस्पिटल  मध्ये ती जोइन झाली आणि बाबाचे आणि तिचे जमले . आणि मग काय , आपली सारखाच , शुभ मंगल सावधान. मग काही वर्षात काका गेला आणि त्या धक्क्याने आजोबा पण . जावू दे . तुला तर सगळे सांगितले न आजीनी परवा  "
"हो रे , सांगितले . माहितीये मला सगळे आणि माझ्या साठी ओके आहे सगळे त्यात काय . "
"गुड . बर चल तुझ्या साठी जर खरेदी करू "
अनु आणि आकाश नि बरीच खरेदी केली , अनु नि आठवणी ने इरा साठी पण घेतले बघून आकाशाला बरे वाटले . सकाळ पेक्षा त्याचा मूड बरा होता, पण काही वेळेच , जाता जाता अनु म्हणालीच 
"अरे , तू उद्या आहेस न , मग येतोस का सकाळी , मी माझी वेळ  सांभाळून तुला कळवते हवे तर "
"नाही , उद्या नको , मला इरा आणि निमिष  बोलायचे आहे , मला त्यांना पण वेळ दिला पाहिजे "
"अरे पण , ते काय असायचे कि नेहमी तुझ्या सोबत , इतके दिवस लहान असल्या पासून , हवे तर आपण सगळे एकत्र जावू "
"नको , मला फक्त त्यांना भेटायचे आहे , तुला कसा भेटलो न तसाच आणि एकत्र असायचे म्हणशील तर आत आपण सुद्धा आहोतच कि इतर जन्मभर "
"अरे पण , आई म्हणत होत्या कि  हॉस्पिटल ची अजून जबाबदारी येयील तुझ्या वर मग तुला वेळ नाही मिळणार , म्हणून मग "
"असू दे , त्यातूनहि जमले तर थोडा वेळ आपण सगळे जावू बाहेर आणि हो या पुढे प्लीज मला जे काय असेल ते सांगा तुम्ही लोक , हे रूम चे जे काही आहे ते काय मला पटले नाहीये "
"ठीक आहे , मग संग तूच इराला कि आम्हाला ती रूम नकोय "
"मी असे म्हणालो नाहीये , मी फक्त इतकाच म्हणतोय कि मला पण  सांगत चला  इतकच. आणि पाहिले मी इराला   झापणार आहे , फार मोठी झाल्या सारखी वागते ती आणि तुम्ही तिला खात पाणी घालतंय . जावू दे . भेटू उद्या जमले तर "
"बरे , बाय "
आकाशला बाकी काही प्रोब्लेम नवता , पण अनु उगाच चिडली आणि म्हणाली कि सांग  आम्हाला ती रूम नकोय . इरा पण हट्टी  आहे , पण आई ला आणि अनु ला कळायला हवे कि ती तिची रूम आहे . आज्जी शेजारची आणि वेगळी  रूम हवी म्हणून गोंधळ घातला होता पोरीने लहान पणी , आणि मग तिला कधी कधी एकटे वाटायचे किंवा भीती वाटली तर मी जायचो त्या रूम मध्ये . मग हळू हळू शिफ्ट च झालो मी पण तिथे . लहान पणीच्या किती आठवणी , खेळणी , पुस्तके सारे काही जपून ठेवले होते त्या रूम मध्ये आपण . माझे लग्न ठरल्या वर इरा म्हणाली पण , कि आपली दोघांच्या मुलांसाठी आपण हि खोली राखून ठेवू नंतर , या खोली मधले बालपण जपायचे आहे मला . कसली आवडली होती मला तिची कल्पना . आणि अनु ला  वाटले हि खोली माझी असे . माझी नाही इराची होती , किंवा आमच्या दोघांची होती ती , एक क्षणात इत ती द्यायला तयार झाली , आणि मला न विचारता , सांगता . तिचे त्या खोली बद्दल चे स्वप्न , मला नाही जपता आले . असे कसे होवू शकते . भावंडामध्ये  सगळ्या गोष्टींची वाटणी नसते , हे तुला - हे मला अशी . ती खोली आमच्या दोघांची होती , आणि म्हणूनच मला ती माझ्या एकट्याचा वाट्याला नको होती . जसे आपण आई बाबा , आजी आजोबा त्यांचे प्रेम आणि आठवणी नाही वाटून घेवू शकत तसच हे पण . इराचे किती प्रेम आहे आपल्या वर आणि मन पण किती मोठे आहे . 
आकाश घरी पोचला तरी काय माहित या एका छोट्या गोष्टीनी त्याचे मन उदास होते आणि इरा न्हवती तर आणखीनच उदास होते , तो तिच्या नव्या रूम मध्ये राहत होता सध्या . हि पण रूम छान होती , तसे तर त्यांचे घरच छान होते . पण आकाश येणार म्हणून तिने त्याचं आवडीची फुले रूम मध्ये ठेवली होती . तो सहज रूम मध्ये पुस्तके उलटी-पालटी  करत होता आणि त्याला औषधा ची लिस्ट पडलेली दिसली , वर इराचे नाव होते . विनिता मावशी कडून औषधे घेतली हिने , काय झाले होते मागच्या , महिन्यात फोन वर एक दिवस आड बोलायची आम्ही , आई पण काही नाही बोलली आणि इरा पण आणि अनु पण . न राहवून त्याने विनिता मावशीला फोन केला 
"काय ग कशी आहेस ?"
"बरेच दिवसांनी आठवण झाली तुला , आता काय बायको येणार म्हणजे आम्हाला सुट्टी "
"असे नाही ग , आणि काय ग तू स्वतचे क्लिनिक सूर केलस का "
"हो रे , म्हणजे संध्याकाळी घरीच जर , हॉस्पिटल मध्ये फक्त सकाळीच जाते मी , होत नाही आता मला तितकसे 
  आणि किती दिवस कष्ट करायचे . नव्या लोकांना संधी नको  द्यायला "
"म्हणजे , आणि मला कुणीच नाही बोलले हे , अरे काय चालले  हे , आलाय पासुन नवीन नवीन काही तरी "
"अरे तसे काही नाही , मला जर कंटाळा आला आहे , तुझी आई तर मला सोडायलाच  तयार न्हवती म्हणून सकाळी यायचे असे ठरलाय . अरे नोकरी करणार्याला retirement असते , आम्हाला काय . म्हणून मीच ठरवलंय . आणि अरे मी संध्यकाळी फक्त ठराविक लोकांना  कन्सल्ट करते , ज्यांना बाहेर परवडत नाही त्यांना . "
"आणि इराला पण का ? काही औषधा ची यादी दिसली , म्हणून विचारतोय "
"अरे काही विशेष  नाही . तिला जर ३-४ दिवस ताप होता . म्हणून आली माझ्या कडे. मला म्हणाली घराचे डॉक्टर नकोत , औषधांचा आणि पथ्याचा मारा करतात , त्या पेक्षा तू बरी , डॉक्टर लांब असेल तर जरा बरे असते , नाही तर मला रूम च्या बाहेर पण पडता यायचे नाही . काही नाही रे , दगदग आणि जर बोर झाली असेल , तू नाहीस  , आता आई असते तुझी पण आता तुझ्या लग्नाची  तारीख पण ठरेल मग तिची पण गडबड असते रे . आणि हिला तरी कुठे वेळ असतो, अभ्यास , मित्र मैत्रिणी . तरी निमिष आहे इथेच म्हणून बरे आहे म्हणाली . अरे रूम बदलाली , तर सवय नाहीये म्हणून जर झोप झाली नाही असे म्हणत होती . काळजीच काहीच नाही .  "
"बरे , पण तरी मला सांगायचं न तिने फोन वर . रोज काय भाजी खाली ते सांगते आणि हे "
"अरे उगाच तुला काळजी म्हणून नसेल बोलली . इतकाच . आता ओरडू नको तिला "
"नाही ग , आणि ओरडायला भेटू तर दे "
आकशाला आल्या पासून अस्वस्थ वाटावे अश्याच घटना होत्या सगळ्या . निमिष पण बोलला नाही आपल्याला काहीच . निमिष ला सांगतो या पोरी वर लक्ष ठेवायला अधून मधून आणि आई ला पण सांगायला पाहिजे कि इतके दिवस मी होतो आणि आजी पण होती सो तशी गरज न्हवती . म्हणजे आई चे पण लक्ष असायचे पण तिला रोज बारीक सारीक गोष्टी नाही बघायला लागायच्या . पण आता मी पण नाहीये इथे आणि माझे लग्न ठरलाय तर एवढे त्याच्याच मागे लागण्या सारखे काय आहे त्याच्या आणि इरा हुशार आहे , समंजस आहे म्हणून ठीक , पण तरी थोडे लक्ष नको का तिच्या कडे. ती मुलगी बडबड खूप करेल पण त्रास असेल कसला तर कुणाला कळायचा नाही अगदी आई ला सुद्धा सांगणार नाही . आकाश ला झोप लागली 
"दादू उठ , चहा केलाय मी , लवकर उठ "
"इरा, तू कधी आलीस आणि मला न सांगता का गेलीस काल तू ?"
"स्टोरी आहे मोठी , नंतर बोलू, तुझा लाडका निमिष पण येतोय , आता इकडच . मी आवरते  "
"इरा , एक मिनिट , मला खूप विचारायचे आहे तुला "
"अभी के अभी ?, चहा पिताना नाही का चालणार ?"
"नाही , आता "
"हे बघ , काल  जाने खरच गरजेचे होते आणि रूम बद्दल म्हणशील तर , मला वाटले ते मी केले , इतका अधिकार आहे मला या घरात , आता हा विषय नको , "
"आणि आजारी होतीस त्याचे काय ?"
"त्याचे काय , औषध घेतले बरी झाले आणि तुला नाही सांगितले कारण उगाच कशाला तुला त्रास , तू  इअक्दे आला असतास पळत "
"मग त्यात काय झाले , यायला नकॊ गरज असेल तर "
' हो पण , गरज सगळ्यांना असेते न , आईला , बाबांना , अनुला सुद्धा , तेव्हा नाही तू येत हातातले काम टाकून "
"इरा , काही तरी काय , मी प्रत्येक खेपेस त्यांच्या साठी पण आलोय ना . पण तुझ्या बाबतीत जेव्हा मला वाटेल माझी गरज  आहे तेव्हा मी येणार , मग बाकीच्या लोकांना,.  अगदी तुला  सुद्धा ती गरज नाही असे वाटले तरी. एक लक्षात ठेव इरा , मी फक्त भाऊ नाहीये तुझा , माझ्या पासून काही लपवायचे नाही कधीच . कसे सांगू मी तुला , "
"अरे हो , कळले , नाही होणार आता असे , पण आवर निमिष येयील आणि अनु सुद्धा "
"तिला का बोलवले आहेस ? , असू दे . "
इरा आवरून खाली आली , अनु , निमिष आणि आकाश गप्पा मारत होते . 
"इरा किती गोड दिसातीयेस "- अनु 
"मस्का बाजी ,अरे नवऱ्याची बहिण , महत्वाची बाबा. काय म्हणा हा अनु  वाहिनी , तुम्ही हुशार खऱ्या "- निमिष 
"गप रे , निमिष , उगाच काय ?"- इरा 
"इरा, एक विचारू का ग ? मी आणलेले  ते कानातले तू घालत नाहीस का आता . अग , अनु ला तसलेच आणायचं विचार आहे माझा मुंबई हून , म्हणून लक्षात आले कि outdated  आहेत ते आता "
"नाही रे , म्हणजे आहेत ते कुठे तरी असेच , लक्षात नाही आता . शोधून ठेवते "
"एक मिनिट इरा , ते किती महाग आहेत माहितीये न तुला आणि तू असे कुठे पण ठेवणारी नाहोयेस "- निमिष 
"निमिष, तू यात पडू नको हा उगाच , मी आणि माझा भाऊ बघून घेवू काय असेल ते "- इरा 
ते चोघे बाहेर पडले ,  थोड्या वेळानी या मुली काही तरी खरेदी करत होत्या , आणि आकाश आणि निमिष कॉफी शॉप  मध्ये बसून होते . 
"आकाश , तुला एक सांगू . मला असे वाटतय कि ते कानातले अनु कडे आहेत .  मला पहिली सरखे वाटतात . खरे तर माझ्या लक्षात नसते आले पण मध्ये एकदा , मी आणि इरा असाच बाहेर आलो होते आणि अनु भेटली तर इरा तिला म्हणाली कि तुला छान दिसतात बघ हे इरिंग. मला तेव्हा  इतके काही लक्षात नाही आले . मी इरले नंतर विचारला तर म्हणाली कि अरे पर्व अनु आली होती तेव्हा गपाप सुरु होत्या , गिफ्ट्स वगिरे .  तेव्हा ती इरली म्हणाली कि तुझी कडे क्लासी  असते सगळे , मस्त आणतेस तू . तर इरा तिला म्हणाली कि अग मला तर आवड पण नाहीये पण आधी आईची आणि नंतर आकाश ची हौस. तुला काही हवे असले तर घे यातले यातले . मग अनुला त्या earrings आवडल्या आणि इराणी देवून टाकल्या   "
 "मग मला का नाही सांगितले . म्हणजे मगाशी विषय निघाला तेव्हा पण आणि काळ माझे अनुचे बोलणे झाले झाले तेव्हा पण अनु नि काहीच नाही सांगितले आणि अनुला काय कमी आहे रे , एकुलती एक आहे ती . मला माहितीये कि तिला पैशाचे काही नाही विशेष ."
"हो ते मात्र आहे , ती तशी नाहीये . पण अरे हारच आवडले असेल आणि इराणी दिले न आपणहून मग ?"
"अरे पण का , मी आणले होते न तिच्यसाठी . मी आईला पण हेच म्हणतोय कि जे इराचे आहे ते इराचे  आहे आणि जे अनुचे ते अनुचे "
"आणि तू ?"
"मी अनुच होणारा नवरा , सहजीवी आहे आणि इराचा भाऊ आणि बरा काही आणि विचारले नाहीयेस पण सांगतो तुझा मित्र . आणि मी अनु वर कधीच अन्याय नाही केलाय इरा मुळे किंवा तुझ्या मुळे  . आणि रूम किंवा कानातले किंवा हॉस्पिटल या मधले जे काही झालाय त्यात माझी काहीच हरकत नाहीये . फक्त हे सगळे माझ्या पासून लपवले याचा त्रास होतोय मला . आई नि लपवले आणि इरा नि पण , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनु नि . मला नाही आवडत लपवा छपवी आणि विषय निघाल्यावर  पण तिने सांगू नये . एक सांगू , जेव्हा लोक जाणून बुजून एखादी गोष्ट करतात आणि जेव्हा त्यांना त्याचा गिल्ट  वाटतो न तेव्हाच ती लपवतात . मला वाटले इराला तिची स्पेस हवीये , खर तर तीच माझ्या साठी स्पेस तयार करतीये आणि जपातीये आणि ते करताना ती मला ते कळू देत नाहीये , आणि अनु नि काही मागितले आणि इरा नि दिले तर कदाचित  मला आवडणार नाही आणि मी आणि अनु मध्ये वाद होतील म्हणून मला टाळणे हे इराचे  गिल्ट . हे रूम आणि इरिंग चे अनु नि कसे काय स्वीकारले , कदाचित या सगळ्यावर म्हंज घर , हॉस्पिटल आणि माझ्या वर तिचा जास्त हक्क आहे आता , हे दाखवताना ती अशी वागतिये पण ते कदाचित तिला पण पटत नसावे , म्हणून अनुचे गिल्ट . पण आईचे काय , तिच्या वर तर इराच हक्क आहे न अनु पेक्षा , अगदी तिच्याच भाषेत बोलायचे तर . आणि बाबा न बरे चालतंय हे सगळे . गोष्टी छोट्या च आहेत , पण मला त्या वेगळ्या दिसत आहेत 
आई बाबा न तर कसलच गिल्ट  नाहीये , मग मला का नाही सांगत हे सगळे , त्यांना कसले गिल्ट  आहे?
आकाश भूतकाळात  अडकत चालला होता . तो भानावर आला होता , घड्याळ पहिले , खूप उशीर झाला होता . आता झोपावे , उद्या आई  तर नक्की भेटेल , आणि आता मला माहितीये कि तिला कसले गिल्ट  आहे ते 
क्रमश:

शीतल जोशी